Sankashti Chaturthi 2022 : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. ऑगस्टमध्ये संकष्टी चतुर्थी आज म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी (Sankashti Chaturthi August 2022 Date) आहे. ही अश्विन मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. या दिवशी भक्त गणेशाची पूजा करतात आणि दिवसभर उपवास (Sankashti Chaturthi vrat vidhi) करतात. रात्री चंद्रदर्शन झाल्यावर व्रत पारण केले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णासह गायीची पूजा करण्याचा नियम आहे.
संकष्टी चतुर्थी तिथी आणि शुभ मुहूर्त (Sankashti Chaturthi 2022 Tithi timings) :
संकष्टी गणेश चतुर्थी तिथी : 15 ऑगस्ट 2022
संकष्टी गणेश चतुर्थी तिथी प्रारंभ : 14 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 10:35 वाजता
संकष्टी गणेश चतुर्थी तिथी समाप्ती : 15 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 9:01 वाजता
चंद्रोदयाची वेळ : 15 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 09 : 44 वाजता
संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व (Sankashti Chaturthi Vrat significance) :
संकष्टी म्हणजे संकटकाळात सुटका, म्हणूनच भगवान गणेशाची पूजा केली जाते. कारण गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात, तसेच श्री गणेशाला विघ्नहर्ता देखील म्हटले जाते. हे व्रत पाळल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे मानले जाते.
संकष्टी चतुर्थी व्रत विधी (Sankashti Chaturthi Vrat vidhi) :
दिवसाची सुरुवात पवित्र स्नान आणि श्रीगणेशाच्या पूजेने होते. त्यानंतर भाविक दिवसभर उपवास करतात आणि फक्त फळे आणि दूधाचे सेवन करतात. उपवासात साबुदाणा खिचडी, बटाटा, शेंगदाणे असे सात्विक अन्न भाविक खाऊ शकतात. भक्तगण श्रीगणेशाचेही ध्यान करतात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात. चंद्रदर्शनानंतर ते उपवास सोडतात.
महत्वाच्या बातम्या :