15th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट. 1947 साली याच दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. यावर्षी स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर पारशी बांधवांचं नववर्ष साजरा करण्याचा दिवस म्हणजेच पतेती. हा सण सुद्धा साजरा केला जाणार आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 15 ऑगस्ट दिनविशेष.


15 ऑगस्ट : तिसरा श्रावणी सोमवार (शिवामूठ मूग).


श्रावण महिन्यात सोमवारच्या तिथीला अत्यंत महत्त्व असते. या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. या सोमवारची शिवामूठ मूग आहे. 


15 ऑगस्ट : पतेती.


पतेती हा पारश्यांचा नववर्ष दिवस होय. मुळात पतेती म्हणजे "पश्चात्तापाचा दिवस". हा आत्मनिरीक्षणाचा दिवस आहे. या दिवशी वर्षभरात झालेल्या चूकांची, गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप करण्याचा करण्याचा असतो. 


15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन.


स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. कारण याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.


15 ऑगस्ट : संकष्ट चतुर्थी. 


भाद्रपद महिना श्रीकृष्णासह श्रीगणेशाच्या पूजेसाठी विशेष समर्पित आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी गणेश चतुर्थीचे व्रत करण्याचा कायदा आहे. यंदा भाद्रपद संकष्टी चतुर्थी 15 ऑगस्ट, सोमवारी आहे. तिला हेरंब संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात.


1947 : सिने-अभिनेत्री राखी यांचा जन्म. 


राखी मजुमदार या एक भारतीय सिने-अभिनेत्री आहेत. 1970 सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या राखी यांनी अनेक बंगाली चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. राखी यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये 16 वेळा फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले ज्यांपैकी तीन पुरस्कार त्यांना मिळाले. 2003 साली त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले.  ह्याच वर्षी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले. 


1988 : पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर ‘मिले सुर मेरा तुम्हारा‘ हे गाणे दूरदर्शनवरुन पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले.


1824 : अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.


महत्वाच्या बातम्या :