Sagittarius Weekly Horoscope 4th To 10th March : राशीभविष्यानुसार, 4 मार्च फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 हा आठवडा खास आहे. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? या काळात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...
धनु राशीचे करिअर (Sagittarius Career Horoscope)
ऑफिसमध्ये काही कामं महत्त्वाची असतील आणि या आठवड्यात तुमच्याकडून अनेक कामं होण्याची अपेक्षा बाळगली जाईल. तुमची रखडलेली कामं पुन्हा सुरू होतील. व्यवसायात अडकलेली कामं आता पूर्ण होऊ लागतील. व्यावसायिक नवीन व्यावसायिक करारांची डील फायनल करू शकतात, ज्यामुळे व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल.
धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius Wealth Horoscope)
आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा खूप चांगला जाईल. तुम्हाला कुठूनतरी अनपेक्षित पैसे मिळतील आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगल्या आर्थिक संधी मिळतील. परदेशातून किंवा बाहेरील एखाद्या ठिकाणाहून आर्थिक लाभ होईल. व्यवसायात आयात निर्यातीचं काम चांगलं चालेल. फक्त आठवड्याच्या सुरुवातीला धनु राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्चामुळे त्रस्त होतील.आठवड्याच्या शेवटच्या दिवसात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.
धनु राशीची कौटुंबिक स्थिती (Sagittarius Family Horoscope)
या आठवड्यात तुमचं वैवाहिक जीवन सुधारेल. सासरच्या मंडळींशीही चांगलं जुळून घेईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुम्ही मित्रांसोबत घरी पार्टी आयोजित करू शकता.
धनु राशीचे लव्ह लाईफ (Sagittarius Love Horoscope)
या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव कराल. प्रियकरासोबत रोमँटिक ठिकाणी फिरायला जाल. जोडीदाराच्या शोधात असलेल्या अविवाहितांनी लग्नाची घाई करू नये आणि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीचा विचार करावा.
धनु राशीचे आरोग्य (Sagittarius Health Horoscope)
आठवड्याच्या सुरुवातीचा भाग धनु राशीच्या लोकांसाठी थोडा त्रासदायक असेल. या काळात तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, तुम्हाला दवाखान्यात जावं लागेल. तब्येत बिघडू शकते, त्यामुळे सावध राहा. तुम्हाला छातीशी संबंधित एखादी आरोग्याशी संबंधित समस्या जाणवू शकते. आठवड्याच्या मध्यात तब्येत सुधारेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :