Sagittarius Weekly Horoscope 18 To 24 November 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, नोव्हेंबर महिन्यातला तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा धनु राशीसाठी नेमका कसा असणार आहे? धनु राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा धनु राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु राशीची लव्ह लाईफ (Sagittarius Love Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला तुमचे प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसेच, या आठवड्यात तुमच्या नात्यात चढ-उतार पाहायला मिळतील. यासाठी तुमच्या भावना तुमच्या पार्टनरबरोबर व्यक्त करा. जेणेकरुन मनात कोणताच संकोच राहणार नाही.
धनु राशीचे करिअर (Sagittarius Career Horoscope)
धनु राशीच्या लोकांनी आपल्या करिअरच्या बाबतीत सावधानता बाळगण्याची गरज आहे. तुम्हाला काही टास्क आहेत ते पूर्ण करावे लागतील. तसेच,कामाच्या ठिकाणी अनेक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील त्या तुम्ही वेळीच पूर्ण कराव्यात. काही तरुणांना या आठवड्यात ऑफर लेटर मिळण्याची शक्यता आहे.
धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius Wealth Horoscope)
धनु राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. मात्र, खर्चाच्या बाबतीत तुम्ही थोडं नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या आधी तुम्ही 10 वेळा विचार करावा. त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा. या आठवड्यात जे व्यवसायिक आहेत ते आपला व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असतील. तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार होईल. तुमच्या कुटुंबात काही कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचे पैसे खर्च होऊ शकतात.
धनु राशीचे आरोग्य (Sagittarius Health Horoscope)
धनु राशीच्या लोकांचं आरोग्य या कालावधीच चांगलं असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात समतोल ठेवावा लागेल. तसेच, हेल्दी लाईफस्टाईलसाठी तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात व्यायामाने करावी लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :