Jalgaon Gold News : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर जळगाव (Jalgaon) शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. नाकाबंदी दरम्यान साडेपाच कोटी रुपयांचे सोने (Gold) आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील  रेमंड चौकात काल सायंकाळी पोलीस वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एका वाहनात तिजोरीमध्ये साडेपाच कोटी रुपयांचे सोने आढळून आले आहे. 


दरम्यान, यासंदर्भात  सगळ्या संदर्भात पोलिसांनी या सोन्याची प्राथमिक चौकशी केली असता, शहरात असलेल्या नामांकित अशा तीन ज्वेलर्स चे हे सोने असल्याची माहिती मिळाली आहे. मोठ्या प्रमाणात सोने असल्याने, हे सोने पोलिसांनी ट्रेझरीमध्ये जमा केले आहे. आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या वतीने कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याचे पोलीस सुत्रांनी म्हटलं आहे.


सोने नियमितरित्या व्यवहारातील 


दरम्यान, सोने व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, हे सोने नियमितरित्या व्यवहारातील आहे. त्याची कागदपत्र पोलिसांना देण्यात आली असल्याचं सोने व्यवसायीकांनी म्हटलं आहे. दरम्यानं, व्यावसायिकाने जरी म्हटले असले नियमितरित्या व्यवहारातील हे सोने आहे, तरीदेखील पोलीस कसून चौकशी करत आहेत. तसेच कागदपत्रांची देखील तपासणी सुरु झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 2.27 किलो सोनं जप्त, दुबईवरुन आलेल्या प्रवाशाला अटक