Weekly Horoscope 18 To 24 November 2024 : नोव्हेंबरचा तिसरा आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. हा आठवडा फार खास असणार आहे. कारण या आठवड्यात सूर्य आणि शनीचं संक्रमण झालं आहे. त्यामुळे अनेक राशींवर याचा परिणाम होणार आहे. तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांचं नवीन आठवड्यात मन प्रसन्न असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली वाढ पाहायला मिळेल. या काळात तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, तुमच्या सुख-सुविधांची चांगली वाढ झालेली दिसेल. आठवड्याच्या शेवटी मात्र पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. अशा वेळी राग बाजूला ठेवून समजूत घालण्याचा प्रयत्न करा. ग्रहांचं संक्रमण तुमच्यासाठी लकी ठरणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. सूर्याचं संक्रमण वृश्चिक राशीत झाल्या असल्याने या राशींना चांगला लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीचा अति ताण घेऊ नका. भावनांवर नियंत्रण ठेवा. तसेच, कामाच्या बाबतीत तुम्ही फार फोकस असाल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला दिसेल. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा तिसरा आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमचं मन अशांत असेल. छोट्या-छोट्या गोष्टींचा तुम्हाला राग येईल. तसेच, कधी कधी रडावंसं देखील वाटेल. तुमच्या आयुष्यात एकाकीपणा जाणवेल. अशा वेळी तुमच्या मनाला खुश करणाऱ्या गोष्टी करा. फिरायला जा. छान संगीत ऐका. इतरांवर अवलंबून मात्र राहू नका. अन्यथा तुम्हालाच पश्चाताप होण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संकटांचा असणार आहे. शनीच्या मार्गी चालीचा मकर राशीवर देखील परिणाम जाला आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी पदोपदी सावध राहण्याची गरज आहे. तसेच, या आठवड्यात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. अन्यथा आयुष्यभर त्याचा पश्चात्ताप तुम्हाला करावा लागेल. या राशीच्या लोकांना आठवड्याच्या शेवटी बाहेर फिरायला जाण्याची संधी मिळेल. अशा वेळी ही सुट्टी सत्करणी कामासाठी वापरा.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीतच शनीची मार्गी झाल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा तिसरा आठवडा लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या मनातूील इच्छा पूर्ण होतील. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे काम पूर्ण होईल. मिळालेल्या संधीचा तुम्ही योग्य लाभ घ्याल. कुटुंबात देखील आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुम्हाला मनासारखा जॉब देखील मिळेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात तुमचं मन धार्मिक कार्यात जास्त रमेल. या संदर्भात तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. तसेच, तुमच्या मुलांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ पाहायला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :