Safala Ekadashi Shubh Yog : संपूर्ण वर्षात एकूण 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचं स्वतःचं महत्त्व असतं. आज 7 जानेवारीला (रविवार), पौष महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशी आहे, ज्याला सफला एकादशी असंही म्हणतात. 2024 मधील ही पहिली एकादशी (Ekadashi) आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जीवनात यश मिळवण्यासाठी सफला एकादशीचं व्रत केलं जातं.
ज्योतिष शास्त्रानुसार, या एकादशीच्या दिवशी शुभ योग देखील जुळून आला आहे. 7 जानेवारीलाच (रविवारी) बुध ग्रह धनु राशीत मार्गी झाल्याने बुधादित्य राजयोग निर्माण झाला आहे, त्यामुळे काही राशींचे शुभ दिन सुरू होणार आहेत. भगवान विष्णूच्या कृपादृष्टीने धनसमृद्धी वाढण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या भाग्यवान राशींबद्दल...
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी सफला एकादशी खूप खास ठरु शकते. या दिवशी झालेल्या बुध ग्रहाच्या राशीपरिवर्तनामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. तुमची सर्व रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.
धनु रास (Sagittarius)
आज सफला एकादशीपासून धनु राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होण्याची शक्यता आहे. बुधाचा धनु राशीत प्रवेश झाल्याने या राशींच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो. व्यापारी वर्गाला मोठा फायदा होईस. नोकरदार लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतो. गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. या काळात रिअल इस्टेटमध्ये वाढ होईल. या काळात धन आणि संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी बुध राशीचा स्वामी मानला जातो आणि बुधाच्या या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी वाढेल. या दरम्यान अवाजवी खर्च करू नका आणि भविष्यासाठी आपले पैसे वाचवा. या काळात तुम्हाला करिअरमध्ये इच्छित यश मिळेल आणि जे डॉक्टर किंवा वकील या व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी हा काळ यशाचा काळ ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: