Shani Dev : शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हणून ओळखले जाते.  शनिदेव (Shani Dev) लोकांना त्यांच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट परिणाम देतो. शनिच्या प्रत्येक हालचालीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडतो. शनि सध्या कुंभ राशीत विराजमान आहे, शनि (Shani) या राशीत वर्षभर राहील. परंतु शनीची हालचाल वेळोवेळी बदलणार आहे. 29 जून 2024 रोजी कुंभ राशीत असताना शनि वक्री होईल.


शनि 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत कुंभ राशीत वक्री राहील. शनीच्या उलट चालीमुळे काही राशींच्या अडचणी वाढतील, तर काही राशीच्या लोकांना शनीच्या या हालचालीचा भरपूर फायदा होईल. शनीच्या उलट्या चालीचा कोणत्या राशींना फायदा होईल? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांना शनीच्या उलट चालीचा विशेष लाभ होईल. या राशींच्या जीवनात धन आणि समृद्धी येईल. शनि विशेषतः मेष राशीवर कृपा वर्षाव करेल. या राशीच्या लोकांना धन, उच्च पद आणि सुखसोयींचा लाभ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचा मान-सन्मान वाढेल.


वृषभ रास (Gemini)


वृषभ राशीच्या लोकांना देखील शनीच्या उलट चालीचा विशेष फायदा होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. शनीची स्थिती व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळवून देईल. या वर्षी शनि या राशीच्या लोकांना अत्यंत शुभ फळ देईल. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात चांगली कामगिरी होईल. शनीच्या कृपेने सर्व कामे सुरळीत होतील.


तुळ रास (Libra)


शनि तुळ राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम देईल. या वर्षी शनीच्या कृपेने तुम्ही केलेल्या बहुतेक कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यापारी आपल्या कामात चांगली कामगिरी करतील, करार अंतिम करण्यासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. शनीच्या कृपेने धन आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुळ राशीच्या लोकांना शनीच्या चालीमुळे खूप फायदा होईल. व्यवसाय आणि नोकरी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी कराल.


धनु रास (Sagittarius)


या राशीच्या लोकांना शनीच्या उलट हालचालीमुळे करिअरमध्ये मोठे यश मिळेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या राशींच्या सुख-समृद्धीत वाढ होईल. शनि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ देईल. करिअरच्या बाबतीत प्रगतीच्या पूर्ण संधी मिळतील. चांगल्या ठिकाणाहून नोकरीची ऑफर येऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. शनीच्या कृपेने तुम्ही अनेक कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडाल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Jupiter : वृषभ राशीत गुरु होणार अस्त; 'या' राशींना घ्यावी लागणार अधिक काळजी