Sun Temple:  रथ सप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सूर्य देव हे तेजाचे प्रतिक हे. या दिवशी सूर्याची पूजा केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. यंदा  शुक्रवारी 16 फेब्रुवारी रथ सप्तमी (Ratha Saptami)  हा सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सूर्य देव हे तेजाचे प्रतिक हे. या दिवशी सूर्याची पूजा केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात.  रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला धन, आरोग्य आणि संतान प्राप्त होते. रथ सप्तमीला तीर्थस्नान केल्यानं सात प्रकारच्या महापापांचा नाश होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.  रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाशी संबंधित आहे. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला सूर्यदेवाच्या खास मंदिराविषयी माहिती देणार आहे.


कोणार्क सूर्य मंदिर (Konark Sun Temple)


भगवान सूर्यदेवाच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये कोणार्कचे सूर्यमंदिर प्रथम क्रमांकावर आहे. ओडिशामध्ये असलेले  कोणार्कचे सूर्य मंदिर देशभरात नाही जगभरात प्रसिद्ध आहे.कोणार्कच्या सूर्य  मंदिराची स्थापना भगवान श्रीकृष्णाचे पुत्र सांब यांनी केली होती. त्यानंतर हे सूर्यमंदिर तेराव्या शतकात  राज नरसिंहदेव यांनी बांधले. त्याचबरोबर हे मंदिर त्याच्या भव्यतेसाठी आणि  कलाकुसरीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्योदयाचा पहिला किरण मंदिराच्या मुख्य दरवाजावर पडतो.


औरंगाबादचे सूर्य मंदिर


बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात सूर्यदेवाचे एक अनोखे मंदिर आहे. य मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा दरवाजा पूर्व दिशेऐवजी पश्चिम दिशेला  आहे. जिथे सात रथांवर भगवान सूर्याच्य तीन रूपाचे दर्शन होते.   धार्मिक मान्यतेनुसार या सूर्य मंदिराचा दरवाजा एका रात्रीत आपोआप दुसरीकडे बदलले गेले


मोढेरा  सूर्य मंदिर (Modhera Sun Temple, Gujarat) 


गुजरातमधील मोढेरा सूर्यमंदिर हे त्याच्या वास्तुकलेचा अतुलनीय नमुना आहे. जो सोळंकी  वंशाचे राजा भीमदेव प्रथम यांनी 1026 मध्ये बांधला होता.  मोढेराचे सूर्य मंदिर दोन भागात बांधले गेले आहे, ज्यामध्ये पहिला भाग गर्भगृहाचा आहे आणि दुसरा सभामंडपाचा आहे. महत्त्वाचे म्हणजे  सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट गर्भगृहात पडतील अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. 


काश्मीरचे मार्तंड मंदिर  (Martand Sun Temple) 


काश्मीरमधील मार्तंड मंदिर हे देशभरातील प्रसिद्ध सूर्य मंदिरांपैकी एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर काश्मीरच्या दक्षिण भागात अनंतनाग आणि पहलगामच्या रस्त्यात मार्तंड नावाच्या ठिकाणी आहे. हे मंदिर कर्कोटा राजघराण्यातील राजा ललितादित्य याने आठव्या शतकात बांधले होते, असे म्हटले जाते. 


आंध्रप्रदेशचे सूर्य मंदिर


आंध्र प्रदेशातील अरसावल्ली गावाच्या पूर्वेला सुमारे 1 किमी अंतरावर सुमारे 1300 वर्षे जुने भगवान सूर्याचे भव्य मंदिर आहे. येथे भगवान सूर्य नारायणाची त्यांच्या पत्नी उषा आणि छाया यांच्यासह पूजा केली जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून दोनदा सूर्याचा पहिला किरण थेट मूर्तीवर पडतो. असे म्हटले जाते की या मंदिरात भगवान सूर्याचे दर्शन केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते.


बेलौर सूर्य मंदिर, बिहार


बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील बेलौर गावाच्या पश्चिम आणि दक्षिण टोकाला असलेले बेलौर सूर्य मंदिर खूप जुने आहे.  ते राजाने बांधलेल्या 52  तलावांच्या मध्यभागी बांधले आहे. या ठिकाणी  मनोभावे  छठ व्रत पाळणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे म्हणतात. 


झालरापाटन सूर्य मंदिर (Surya Temple, Jhalrapatan)


झालरापाटन, राजस्थानातील शहर असून या शहराला  विहिरींचे शहर असेही म्हणतात. शहराच्या मध्यभागी असलेले सूर्यमंदिर हे झालरापाटणचे पर्यटकांचे आकर्षण आहे. त्याच वेळी हे दहाव्या शतकात माळव्यातील परमार घराण्यातील राजांनी बांधले होते. या मंदिराच्या गर्भगृहात भगवान विष्णूची मूर्ती आहे. 


हे ही वाचा :


 Ratha Saptami 2024: रथ सप्तमी कधी आहे? पूजा कशी करायची? जाणून घ्या विधी आणि मुहूर्त