Ramanujachrya Jayanti : भारतीय संस्कृतीत (Indian Culture) अनेक पंथ, धर्म आहेत. या पंथांचे, धर्माचे अनेक थोर व्यक्तींनी प्रसार आणि प्रचार केला आहे. या सर्व धर्मांना पंथाना भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व असून हे धर्म, पंथ फार पवित्र मानले जातात. आजही या धर्मांचे, पंथांचे तितक्याच मनोभावे पालन केले जाते. याच पंथांमधील एक पंथ म्हणजे वैष्णवपंथ. वैष्णपंथांचा अनेक आचार्यांनी प्रसार आणि प्रचार केला. रामानंद, भास्कराचार्य, मध्वाचार्य अशा अनेक आचार्यांचा उल्लेख केला जातो. याच यादीतले आणखी एक नाव म्हणजे रामानुजाचार्य (Ramanujacharya). याच रामानुजाचार्यांची आज जयंती आहे.
रामानुजाचार्यांचे बालपण.....
वैष्णव पंथाबद्दल आपण ज्ञात आहोतच. वैष्णव धर्मातील विशिष्टाद्वैत हा उपपंथ ज्यांनी प्रचलित केला ते म्हणजे रामानुजाचार्य. रामानुजाचार्य यांचा जन्म इसवी सन 1017 शतकात तमिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. असे म्हटले जाते की रामानुजाचार्य लहान असतानाच त्यांचे वडील केशव भट यांचे निधन झाले. त्यानंतर रामानुजाचार्यांनी सर्व वेद आणि शास्त्रांचे ज्ञान प्राप्त करुन घेतले. त्यांनी त्यांचे वेदांचे शिक्षण कांचीच्या यादवप्रकाश गुरुंकडून घेतले.
रामानुजाचार्यांचे गृहस्थाश्रमातील आयुष्य...
रामानुजाचार्य लहान असतानाच त्यांच्या आईवडिलांचं निधन झाल्याचं म्हटलं जातं. त्यांचे वयाच्या सतराव्या वर्षी लग्न झाले. परंतु वेदांचा असलेला ध्यास, त्यामुळे त्यांचे गृहस्थाश्रमात फार मन रमले नाही. त्यांनी गृहस्थाश्रमाचा त्याग करुन संन्यासाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी श्रीरंगमंचच्या यदिराजांकडून संन्यासाची दीक्षा घेतली.
रामानुजाचार्यांचे तत्त्वज्ञान..
वेदांत तत्वज्ञानाचा अभ्यास करुन रामानुजाचार्यांनी त्यांचे विशिष्टाद्वैत तयार केले. त्यांच्या या तत्त्वज्ञानात तीन स्तरांचे महत्त्व सांगितले आहे. त्यांनी मैसूरच्या श्रीरंगमंचच्या यदिराजांकडून संन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर काही काळ तेथेच वास्तव्य केले. परंतु त्यानंतर त्यांनी तेथून निघून रामानुज शालाग्राम याठिकाणी पोहोचले. वेदांतसंग्रह, श्रीभाष्य, गीता भाषा, वेदांतदीपम, वेदांतसारम् यांरखी अनेक साहित्य त्यांनी रचली.
रामानुजाचार्यांनी यमुनाचार्यांना आपले आद्य गुरु मानले होते. त्यांचा मृत्यूनंतर रामानुजाचार्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचे कार्य अविरत ठेवले. रामानुजाचार्यांचा मृत्यू इसवी सन 1137 मध्ये तमिळनाडूतील श्रीरंगमंच येथे झाला. रामानुजाचार्यांचे योगदान वैष्णवपंथात फार महत्त्वाचे मानले जाते. 'श्रीभाष्य' ही रामानुजाचार्यांची प्रसिद्ध रचना आहे. रामानुजाचार्य यांनी विश्वास, जात आणि वंश यासह जीवनाच्या कोणत्याही स्तरावर समतेच्या कल्पनेचा पुरस्कार केला. हैदराबाद येथे सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या पंचधातूंनी रामानुजाचार्य यांचा 216 फूट उंचीचा पुतळा साकार करण्यात आला आहे. हा बैठक स्थितीतील पुतळा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा असून 54 फूट उंच अश्या भद्रवेदी नामक इमारतीवर उभारला गेला आहे.
हेही वाचा
Kedarnath yatra : केदारनाथमध्ये बम बम भोलेचा गजर! मंदिराचे दरवाजे उघडले; यात्रेला जल्लोषात सुरुवात