Kedarnath yatra : केदारनाथमध्ये बम बम भोलेचा गजर! मंदिराचे दरवाजे उघडले; यात्रेला जल्लोषात सुरुवात
उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची कवाडं उघडली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंदिराच्या सजावटीसाठी 20 क्विंटल फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
केदारनाथ मंदिरातील कवाडं सहा महिन्याच्या शीतकालीन कालावधीनंतर सोमवारी पहाटे 6.20 वाजता उघडली.
संपूर्ण जगात 11 वं ज्योतिर्लिंग म्हणून ख्याती असणाऱ्या भगवान केदारनाथांच्या मंदिराची कवाडं मंगळवारी सकाळी परंपरागत पूजा- अर्चा पार पडल्यानंतर खोलण्यात आली.
यावेळी आठ हजार भाविक उपस्थित होते.
उत्तराखंडची चारधाम यात्रा शनिवारी 22 एप्रिलपासून सुरू झाली आहे.
22 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचा दरवाजा उघडला आहे तर 27 एप्रिलला बद्रिनाथ धामचा दरवाजा उघडणार आहे.
खरंतर केदारनाथ मंदिर 22 एप्रिल म्हणजेच अक्षय्य तृतीयेलाच खुलं होणार होतं.
मात्र प्रचंड बर्फवृष्टी आणि पावसामुळे 25 एप्रिल ही तारीख ठरवण्यात आली.
हवामान खात्याने 29 एप्रिलपर्यंत बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे, राज्य सरकारने रविवारी केदारनाथसाठी भाविकांची नोंदणी 30 तारखेपर्यंत थांबवली