Rahu Ketu Transit 2025: राहू आणि केतू या ग्रहांना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. राहू-केतू हे छाया ग्रह आहेत, जे एका निश्चित वेळेनंतर राशी आणि नक्षत्र बदलतात. राहु-केतूच्या चालीमध्ये जेव्हा जेव्हा बदल होतो, तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. काही लोकांना राहु-केतू संक्रमणाचा फायदा होतो, तर काही लोकांना विविध समस्यांनाही सामोरे जावे लागते. मात्र नुकतंच राहू-केतूने नक्षत्र बदललं असल्याने त्याचा काही राशींना मोठा फायदा होताना दिसणार आहे.

Continues below advertisement


राहू-केतूमुळे विविध राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता


ज्योतिषशास्त्रानुसार, अलीकडे राहू-केतू या ग्रहांनी नक्षत्र बदलले आहे. या ग्रहाच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. वैदिक दिनदर्शिकेच्या गणनेनुसार, 16 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 6:50 वाजता, राहू पूर्वाभाद्रपद नक्षत्रात आणि केतूचे उत्तरा फाल्गुनीमध्ये संक्रमण झाले आहे. राहू-केतूचे संक्रमण कोणत्या वेळी झाले? राहू-केतूच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना अधिक लाभ होण्याची शक्यता आहे? जाणून घेऊया..


राहू-केतू संक्रमणाचा राशींवर शुभ प्रभाव


मेष


ज्योतिषशास्त्रानुसार, राहू-केतूच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना काही विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात आनंद राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत दर्जेदार वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला त्यांना जाणून घेण्याची संधी मिळेल. तरुणांना प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात आल्याने फायदा होईल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये लवकरच उच्च स्थान प्राप्त करू शकता. जे अविवाहित आहेत आणि कोणावर प्रेम करतात, त्यांचे नाते या महिन्यात कायमस्वरूपी होऊ शकते.


कर्क 


ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण लकी ठरणार आहे. पालकांचा मानसिक ताण कमी होईल. मुलाचे लग्न लवकरच निश्चित होऊ शकते. नोकरदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्याने फायदा होईल. समाजात नाव कमावण्यासोबतच पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. जर तुम्ही एखाद्या मित्राला पैसे दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे.


धनु


ज्योतिषशास्त्रानुसार, राहू-केतू संक्रमणाचा धनु राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनावर शुभ प्रभाव पडेल. ज्या लोकांचे नुकतेच लग्न झाले आहे त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी घट्ट नाते असेल. वृद्ध लोकांचे आरोग्य बिघडत असेल तर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. जे लोक दीर्घकाळापासून अविवाहित आहेत त्यांना या आठवड्यात राहु-केतूच्या आशीर्वादाने त्यांचे प्रेम मिळू शकते. नोकरदार आणि व्यावसायिकांना लवकरच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा>>


Weekly Horoscope 17 To 23 March 2025: मार्चचा नवा आठवडा सुरू! 'या' राशींचे नशीब पालटणार, नोकरीत प्रमोशन, पैसाच पैसा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)