Rahu Gochar 2025 : ज्योतिषशास्त्रात, राहू (Rahu) हा एक असा ग्रह मानला जातो, जो अनेकदा नकळत लोकांच्या जीवनावर परिणाम करतो. शनि इतकंच ज्योतिषशास्त्रात राहूला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. राहू नेहमी उलट दिशेने फिरतो आणि त्याच राशीत सुमारे 18 महिने राहतो. वैदिक दिनदर्शिकेनुसार, सध्या राहू मीन राशीत आहे, परंतु 18 मे 2025 रोजी तो कुंभ राशीत प्रवेश करेल. या बदलाचा 3 राशींवर वाईट परिणाम होऊ शकतो, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
कुंभ राशीतील राहूचा प्रवेश वृषभ राशीच्या लोकांची डोकेदुखी वाढवू शकते. या काळात वृषभ राशीच्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागेल. या लोकांना राग अनावर होईल, अस्वस्थ वाटू शकतं. या काळात अचानक अशा काही गोष्टी घडतील, ज्याचा परिणाम तुमच्या उत्पन्नावर होईल. तुमचे खर्चही वाढू शकतात. नोकरीतील प्रगती थांबू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना तोटा होऊ शकतो. शिकणाऱ्या मुलांनाही अभ्यासात रस नसेल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण होऊ शकतं.
कर्क रास (Cancer)
राहूचा कुंभ राशीत प्रवेश कर्क राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव टाकू शकतो. या काळात तुम्हाला कामात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेदांना सामोरं जावं लागू शकतं. कौटुंबिक जीवनातही वादाला तोंड फुटेल. यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण मानसिक आणि शारीरिक दोन्ही समस्या उद्भवू शकतात. व्यवहारात सावधगिरी बाळगा. वादापासून दूर राहा.
मीन रास (Pisces)
राहूचं संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी देखील चांगलं नाही. या काळात तुमचं मन अस्वस्थ राहू शकतं. व्यवसायातही अडथळे येऊ शकतात. धनहानी होऊ शकते. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यावेळी, खर्चाची देखील काळजी घ्यावी लागेल, कारण अचानक बरेच खर्च उद्भवू शकतात. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. डोकेदुखी किंवा झोप न लागणे यासारख्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :