Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahu Gochar 2025 : नवीन वर्षात राहूची शनीच्या राशीत वक्री; 5 राशींचं नशीब फळफळणार, नवीन नोकरीसह धनलाभाचे संकेत
वृषभ रास (Taurus) : राहूच्या संक्रमणामुळे 2025 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगलं राहणार आहे. लवकरच तुमचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्व कामात यश मिळू लागेल. तुमच्या आयुष्यात खूप चांगले दिवस येतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. राहूचं संक्रमण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
धनु रास (Sagittarius) : 2025 मध्ये धनु राशीच्या लोकांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळेल. तुम्हाला तुमच्या लहान भावंडांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही खूप काही साध्य कराल.
तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठं यश मिळू शकतं. या काळात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल.
मीन रास (Pisces) : राहू तुमची रास सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. राहू आणि शनीचे संबंध खूप चांगले असल्याचं सांगितलं जातं. दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने 2025 मध्ये तुम्हाला राहूच्या या संक्रमणाचा पुरेपूर फायदा होईल.
राहू या काळात तुम्हाला मोठं यश मिळवून देईल. 2025 पासून अडीच वर्षांत तुमची खूप प्रगती होईल. तुम्ही तुमची मालमत्ता, घर किंवा वाहन देखील खरेदी करू शकता.
सिंह रास (Leo) : सिंह राशीच्या लोकांसाठी राहुचं संक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात राहू तुमच्या आयुष्याला वळण देईल. करिअरच्या दृष्टीकोनातूनही वेळ तुमच्यासाठी खूप चांगली राहील. नवीन वर्षात तुम्हाला चांगलं प्रमोशन मिळेल.
नोकरदार लोकांनाही बढती मिळू शकते. तुमचा पगारही वाढेल. कौटुंबिक वातावरणाबद्दल बोलायचं तर, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती नांदेल.
मेष रास (Aries) : राहूचं संक्रमण तुम्हाला पुढील वर्षात चांगली संपत्ती आणि आनंद देईल. तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ दिसेल. तुमचे तुमच्या मित्रांसोबतचे संबंध खूप चांगले असतील. तुम्हाला तुमचा मोठा भाऊ किंवा काका यांच्याकडून लाभ मिळू शकतो.
या काळात तुम्हाला त्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच, या काळात तुम्ही जी काही गुंतवणूक कराल ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला आर्थिक लाभ होऊन मोठी रक्कम मिळेल. या काळात तुमचं उत्पन्न दुप्पट होईल.