Rahu Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार शनि नंतर सर्वात मंद गतीने मार्गक्रमण करणारे ग्रह म्हणजे, राहू (Rahu) आणि केतू (Ketu). हे दोन्ही ग्रह दीड वर्षाने राशी बदलतात, त्यात हे दोन्ही ग्रह उलटी चाल चालत असल्याने त्याचा तीव्र परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. राहू-केतू यांना छाया ग्रह म्हणतात आणि त्यांच्या वाईट प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनाच अनेक अडचणी येतात. ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहूची स्थिती चांगली नसेल तर त्याचं संपूर्ण आयुष्य बरबाद होतं, समस्यांचा सामना करुन नाकेनऊ येतात.


परंतु हेच छाया ग्रह शुभ परिणाम देखील देतात. ज्योतिषशास्त्रानुसार, राहू सध्या मीन राशीत आहे आणि 18 मे 2025 रोजी दुपारी 4:30 पर्यंत तो या राशीत राहील. यानंतर तो कुंभ राशीत प्रवेश करेल. राहूच्या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांना फायदा होईल, तर काही राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. या काळातील राहू संक्रमण 3 राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी ठरेल. या राशींवर जवळपास वर्षभर राहूची कृपादृष्टी राहणार आहे, या भाग्यवान राशींबद्दल (Zodiac Signs) जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


राहू या राशीच्या अकराव्या घरात आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. अपार संपत्तीचे दरवाजे उघडतील. यासोबतच अनपेक्षित स्रोतातून आर्थिक लाभही होऊ शकतो. खूप दिवसांपासून अपूर्ण असलेल्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. आयुष्यात आनंदीआनंद पाहायला मिळेल. तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता. परदेशात व्यवसाय असेल तर तिथूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काळात खरेदी करण फायदेशीर ठरू शकते. नवीन गुंतवणूक करणं देखील फायदेशीर ठरेल. यासोबतच तुम्हाला कामाच्या संदर्भात लांबच्या प्रवासाला जावं लागेल. अशा वेळी तुम्ही कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकणार नाही, परंतु ते तुमच्या करिअरसाठी चांगलं ठरू शकतं.


मिथुन रास (Gemini)


राहू या राशीच्या नवव्या घरात आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. तुम्हाला कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. या काळात मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र, तुमच्या खर्चात थोडी वाढ होईल. पण तुम्ही ते सहज कव्हर कराल. नोकरदारांनाही या काळात खूप फायदा होणार आहे. तुम्हाल पदोन्नती आणि पगारवाढीची बातमी मिळेल. एकंदरीत 2025 पर्यंत मिथुन राशीच्या लोकांवर राहूचा प्रभाव चांगला राहणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे.


वृश्चिक रास (Scorpio)


राहू मीन राशीच्या पाचव्या घरात आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना अपार यशासोबत आर्थिक लाभही मिळू शकतो. बेटिंग आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. यासोबतच अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करू शकता. यासोबतच आरोग्याची काळजी घ्या. तुमची एकाग्रता आणि बुद्धिमत्ता या काळात वाढेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : पुढील 3 महिन्यांचा काळ 'या' राशींसाठी अडचणींचा; शनि नक्षत्र परिवर्तन ठरणार घातक, साडेसातीचा होणार त्रास