Travel : रामायण हा हिंदू धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो. आपण भगवान श्रीरामाची पूजा करतो आणि त्यांच्यासोबत देवी सीतेचीही पूजा केली जाते. देवी सीता ही भगवान श्री रामाची अर्धांगिनी होती आणि महाराज जनक यांची कन्या होती. देवी सीतेची अशी अनेक मंदिरे देशभरात आहेत, जी इतिहासाचे दर्शन घडवतात. परंतु भारतात देवी सीतेचे एक मंदिर असे देखील आहे, जिथे प्रभू रामाशिवाय माता सीतेची पूजा केली जाते. या मंदिराचे रहस्य जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. यंदा सीता नवमी 16 मे रोजी साजरी होणार आहे. त्यानिमित्त जाणून घ्या या मंदिरांबद्दल



रामायणातील रहस्यही जाणून घ्या


ही मंदिरे अशी आहेत जिथे दररोज हजारो लोक दर्शनासाठी येतात. या मंदिरांमधून तुम्हाला रामायणातील रहस्येही समजू शकतात. भारतात एक खास मंदिर आहे, जिथे देवी सीतेसोबत तिची जुळी मुले लव-कुश यांचीही पूजा केली जाते. अशा खास मंदिरांची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात देणार आहोत. सीता नवमी 2024 ला तुम्ही येथे भेट देऊ शकता. 



शांत वातावरणात वसलेले मंदिर


वायनाडमध्ये स्थित देवी सीतेचे हे खास मंदिर हिरवीगार झाडांनी झाकलेले आहे. हे भारतातील दुर्मिळ मंदिरांपैकी एक आहे. येथे मंदिरात तुम्हाला लव आणि कुशच्या मूर्तीही पाहायला मिळतील. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर शांत वातावरणात वसलेले आहे. येथे पूजेसाठी येणाऱ्या भाविकांना खूप आराम वाटतो. हे मंदिर सीतादेवी लवकुश मंदिर म्हणूनही ओळखले जाते.



वेळ- सकाळी 5:00 ते दुपारी 12:30
संध्याकाळी 5:30 - 7:30 सायंकाळी


 


सीता गुंफा, महाराष्ट्र


रामायणमध्ये नाशिकमध्ये असलेल्या सीतेच्या या मंदिराबद्दलही तुम्हाला माहिती मिळू शकते. नाशिकच्या पंचवटी येथे असलेले हे मंदिर सीता गुंफा म्हणून ओळखले जाते, कारण माता सीता भगवान राम यांच्या वनवासात येथे राहिली होती. या ठिकाणी तुम्हाला पाच पवित्र वटवृक्षही दिसतील. त्यामुळेच हे ठिकाण पंचवटी म्हणून ओळखले जाते. गुहेत जाण्यासाठी पायऱ्या पार कराव्या लागतात.


वेळ- सकाळी 6.00 ते रात्री 9.00 पर्यंत.
कसे जायचे- नाशिक रेल्वे स्टेशनपासून गुहा फक्त 5 किमी अंतरावर आहे.


 


या मंदिरात प्रभू रामांशिवाय देवी सीतेची होते पूजा


मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील कारिला येथे माता सीतेला समर्पित सर्वात खास मंदिर आहे. हे भारतातील सर्वात वेगळे आणि विशेष मंदिर मानले जाते कारण येथे श्री रामशिवाय माता सीतेची पूजा केली जाते. या मंदिरात माता सीता आपल्या दोन मुलांसह उपस्थित आहे. हे भारतातील प्रसिद्ध माता सीता मंदिरांपैकी एक आहे. असे मानले जाते की जेव्हा भगवान रामाने माता सीतेचा त्याग केला तेव्हा ती येथेच राहिली होती. देवी सीतेने आपले पुढील आयुष्य जंगलात वसलेल्या महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात व्यतीत केले.


 


हेही वाचा>>>


Travel : सुख आणखी काय असतं..! निसर्गाच्या कुशीत लपलेली महाराष्ट्रातील 'ही' सुंदर तलावं, तणाव होईल दूर, जेव्हा इथे भेट द्याल 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )