Rahu Favorite Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये, राहुला (Rahu) क्रोधित आणि मायावी छाया ग्रह मानलं जातं. राहु हा ग्रह माणसाला त्याच्या मर्यादेत राहायला शिकवतो असं म्हणतात. माणूस जेव्हा शरीर, पैसा आणि प्रसिद्धीच्या अभिमानाने धुंद होतो, तेव्हा राहु त्याच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण करतो की, अहंकारी माणूस एकदम कंगाल होऊन जातो. त्याला अनेक आजार जडतात. माणसाने अहंकार दाखवला की राहू झटक्यात त्यांचा अहंकार मोडतो. राहु बहुतांश वेळा अशुभ परिणाम देतो, असं म्हणतात. परंतु अशा काही राशी आहेत, ज्या राहूला अत्यंत प्रिय आहेत आणि त्यांच्यावर राहूची नेहमी कृपादृष्टी असते. यांच्यावर राहु सुखाचा आणि प्रेमाचा वर्षाव करतो. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृश्चिक रास (Scorpio)


राहूची आवडती रास वृश्चिक आहे. या राशीवर त्याचे आशीर्वाद नेहमीच असतात. या राशीचे लोक नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती करतात. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये अचानक एवढं मोठं यश मिळतं की, ज्याचा त्यांनी याआधी विचारही केला नसेल. वृश्चिक राशीच्या लोकांकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असतात आणि ते नेहमी आनंदी आणि समृद्धीचे जीवन जगतात. त्यांची कीर्ती समाजात पसरते आणि त्यांना त्यांच्या मुलांकडून प्रेम मिळतं. 


सिंह रास (Leo)


सिंह राशी देखील राहूची अत्यंत प्रिय रास आहे. राहूच्या कृपेमुळे यांना जीवनात कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत नाही. त्यांना एकामागून एक मोठं यश मिळत राहतं. राहूच्या कृपेने त्यांचं शरीर निरोगी राहतं आणि मन प्रसन्न राहतं. राहु सिंह राशीत असताना या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होतो. ते जीवनातील सर्व प्रकारचे सुख उपभोगतात. त्यांना अचानक कुठूनतरी पैसा मिळतो किंवा वडिलोपार्जित संपत्ती मिळते. 


राहूला शांत करण्यासाठी उपाय (Rahu Remedies)



  • रोज 'ओम राहवे नमः' मंत्राचा जप करा.

  • दुर्गा चालिसाचे पठण केल्याने जीवनात शुभ परिणाम प्राप्त होतील.

  • पक्ष्यांना नियमितपणे बाजरी खायला द्या.

  • काळ्या कपड्यात एक नारळ आणि अकरा बदाम बांधून ठेवा. नंतर ते पाण्यात सोडा.

  • शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने शुभ परिणाम मिळू शकतात.

  • तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात पिवळी फुलं लावा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani 2025 : मार्चपर्यंत शनीची चाल एकदा नाही, तर दोनदा बदलणार! 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, पदोपदी होणार बक्कळ धनलाभ