Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कर्मफळ दाता शनि एप्रिलपर्यंत दोनदा आपली चाल बदलणार आहे. 28 फेब्रुवारीला शनिदेवाचा अस्त होणार आहे. शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीतच अस्त होतील. त्यानंतर 29 मार्चला शनिदेव मीन राशीत प्रवेश करणार आहेत. अशा प्रकारे शनि मार्चपर्यंत दोनदा आपली चाल बदलेल. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. त्यांची करिअर आणि व्यवसायात अभूतपूर्व प्रगती होऊ शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मकर रास (Capricorn)
शनिदेवाच्या चालीतील बदल तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो, कारण मार्चमध्ये शनिदेव मीन राशीत प्रवेश करणार आहेत. याबरोबर तुम्हाला शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. यावेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरी बदलण्यासाठी काळ अनुकूल आहे. तसेच, मालमत्ता, शेअर बाजार किंवा व्यवसायातून मोठी कमाई होण्याची शक्यता आहे. चैनीच्या वस्तू आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या चालीतील बदल शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानात प्रवेश करतील. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं. तसेच तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून पैसे कमवू शकता. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सन्मान आणि भरपूर संपत्ती मिळेल. व्यावसायिकांना विशेष लाभ मिळेल आणि फालतू खर्च कमी होईल. कार्यक्षेत्रात नवीन संधी उघडतील. गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर व्यावसायिकांना मोठा व्यवसाय करार करता येईल.
धनु रास (Sagittarius)
शनिदेवाच्या चालीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण शनिदेव तुमच्या राशीतून चौथ्या घरात प्रवेश करणार आहेत. ज्याला सुख आणि संपत्तीचं घर म्हटलं जातं. त्यामुळे या काळात तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचं सुख मिळू शकतं. तसेच या काळात घरात आनंदाचं वातावरण राहील. जुने कौटुंबिक वाद मिटतील. रिअल इस्टेट आणि मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. यावेळी, तुमच्या आईशी तुमचं नातं मजबूत राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: