Pitru Paksha 2025 : नारायणबळी म्हणजे काय? पितर कधी प्रेत बनतात? ज्योतिषशास्त्रानुसार वाचा A To Z माहिती
Pitru Paksha 2025 : उद्या म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 रोजी पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्वपित्री अमावस्या आहे.

Pitru Paksha 2025 : हिंदू शास्त्राप्रमाणे, सध्या सगळीकडे पितृपक्ष (Pitru Paksha 2025) पंधरवडा सुरु आहे. त्यानुसार उद्या म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 रोजी पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्वपित्री अमावस्या (Sarva pitri Amavasya) आहे. या पंधरा दिवसांच्या कालावधी पितृपक्ष नेमका का करतात? पितृपक्ष नाही केलं तर त्याचे परिणाम तसेच, कावळ्याच्या अन्न शिवण्यापासून आपण अनेक गोष्टींची माहिती घेतली. पण, नारायण बळी म्हणजे काय? पितर कधी प्रेत बनतात? या संदर्भातील सविस्तर माहिती आपण डॉ. भूषण ज्योतिर्विद यांच्याकडून जाणून घेऊयात.
नारायणबळी म्हणजे काय?
नारायणबळी हा एक विशेष श्राद्ध विधी आहे. हा विधी प्रेतात्मा, अकाल मृत्यू, अपघाती मृत्यू, आत्महत्या, गर्भपात, प्रेतसंस्कारातील दोष, तसेच पितर शांतीसाठी केला जातो. यामध्ये नारायण (विष्णू) स्वरूपात प्रेताला शांत करून त्याला पुढच्या लोकाला (पितृलोक) गमन करण्यास मदत केली जाते. हा विधी प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर (नाशिक), गोकर्ण, भीमाशंकर, रामटेक अशा तीर्थक्षेत्रांत केला जातो.
पितर कधी प्रेत बनतात?
जेव्हा मृत्यू अकाल, अपघाती, आत्महत्या, विषप्रयोग, बुडणे, गर्भपात, युद्धात मृत्यू अशा अस्वाभाविक पद्धतीने होतो, तेव्हा त्या आत्म्याला पुढच्या लोकाला (पितृलोक, देव लोक) सहज गमन होत नाही. अशा वेळी ती आत्मा प्रेत स्वरुपात भटकत राहते आणि घरच्यांना त्रास देऊ शकते. योग्य विधी (अंत्यसंस्कार, श्राद्ध, नारायणबळी) न झाल्यास आत्मा असंतुष्ट राहतो.
लक्षणे की पितर प्रेत स्वरूपात अडकले आहेत :
सतत स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे.
घरात अचानक अडथळे, रोग, अपघात होणे.
संतती न होणे किंवा गर्भपात वारंवार होणे.
धनहानी, व्यवसायात सतत तोटा.
मन अस्वस्थ व निराश होणे.
त्यामुळेच अशा वेळी नारायणबळी विधी करणे शास्त्रात सांगितले आहे, जेणेकरून आत्म्याला पुढे जाण्याचा मार्ग मिळेल आणि घरच्यांनाही शांती लाभेल.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हेही वाचा :




















