Pitru Paksha 2024 : गणेशोत्सवानंतर अनंक चतुर्दशीच्या दिवसापासूनच म्हणजेच 17 डिसेंबरपासून पितृपक्ष सुरु होणार आहे. या दरम्यान आपल्या पूर्वजांची आणि पितरांची पूजा केली जाते. पितृपक्षाला (Pitru Paksha) श्राद्ध पक्षाच्या नावाने देखील ओळखलं जातं. श्राद्ध पक्षात पितृ पूजा, पितृ तर्पण आणि पिंड दान करणं सर्वात पुण्याचं काम मानलं जातं.
असं म्हणतात की जे व्यक्ती श्राद्धाचं कार्य करतात त्यांना पितृ दोषापासून मुक्ती मिळते. आणि हे कार्य केल्याने पूर्वजांना मोक्ष प्राप्ती मिळते. हिंदू धर्मात पितृ पक्षाची वेळ फार महत्त्वाची मानली जाते. या दरम्यान काही कार्य करणं अशुभ मानलं जातं.
पितृ पक्षात 'या' गोष्टी करणं शुभ मानतात
1. पितृ पक्षात ब्राह्मनांना भोजन आणि वस्त्र दान करुन श्राद्ध करणं फार शुभ मानलं जातं.
2. श्राद्ध पक्षात गाय, कावळा, कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणं फार लाभदायक मानलं जातं.
3. असं म्हणतात की, या काळात ब्रह्मचर्याचं पालन करणं फार शुभ मानलं जातं.
4. मान्यतेनुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष होतो त्यांना या काळात गया, उज्जैन आणि इतर धार्मिक ठिकाणी पिंडदान करावं.
5. पितृपक्षाच्या दरम्यान कांदा आणि लसूणसह तामसिक पदार्थांचं सेवन करु नये.
6. या काळात विवाह, पूजा तसेच कोणत्याही शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते.
7. मान्यतेनुसार, या कालावधीत कपडे आणि बूटं खरेदी करु नयेत.
8. असं म्हणतात की, या दरम्यान केस कापणे, नखं कापणे यांसारखी कामं करु नयेत.
9. या काळात नवीन वस्त्र, सोनं, चांदी यांसारख्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं.
10. पितृ पक्षाच्या दरम्यान गृह प्रवेश करणं वर्जित मानलं जातं. मान्यतेनुसार, असं करणं अशुभ मानलं जातं.
पितृपक्षात जर तुम्ही या गोष्टी पाळल्या तर पुढची सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतं. तसेच, पितरांनाही शांती मिळते असं म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :