Astrology : राशींवर ग्रहांचा विशेष प्रभाव असतो. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तिचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य वेगळे असते. कलियुगात पैशाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की, ज्या लोकांना पैशाचे महत्त्व समजते ते कमी खर्च करतात. तसेच ते पैशांची चांगली बचत करतात. पैशांची बचत होत असल्याने ही मंडळी आनंदीदेखील राहतात. काही लोक विनाकारण पैसे खर्च करत असतात. तर काही मंडळी विचारपूर्वक पैसे खर्च करतात. तर काही राशींच्या व्यक्ती पैसे खर्च करण्यात खूपच कंजूस असतात.
मिथुन (Gemini) : ज्योतिष शास्त्रानुसार, 12 राशींपैकी काही राशींचे लोक पैसे खर्च करण्यात खूप कंजूस असतात. यात मिथुन राशीच्या लोकांचा समावेश आहे. मिथुन राशीचे लोक पैशाची बचत करतात. या राशीच्या लोकांना साधं जीवन जगायला आवडतं.
सिंह (Leo) : सिंह राशीचे लोक सहजासहजी पैसे खर्च करत नाहीत. खर्च करताना ते विचारपूर्वक खर्च करतात. सिंह राशीचे व्यक्ति अनावश्यक खर्च करणं टाळतात.
तुळ (Libra) : तूळ राशीचे लोक पैशाची बचत करत असतात. नेहमी विचार करूनच ही मंडळी पैसे खर्च करतात. तुळ राशीचे व्यक्ति खूपच कंजूस असतात.
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीचे लोक मेहनती मानले जातात. हे लोक कष्ट करून पैसे कमवतात. आणि चांगल्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करतात. या राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनीला कर्माचा दाता देखील म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)
संबंधित बातम्या
Horoscope Today 6 April 2022 : आज मकर राशीला नशीब देणार साथ, इतर राशींचे भाग्य काय म्हणते?
'या' तिथीला जन्मलेल्या लोकांवर असतो देवगुरु बृहस्पतीचा हात
'या' गोष्टींमध्ये दडले आहे ध्येय साध्य करण्याचे रहस्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha