Pisces Horoscope Today 1 November 2023 : मीन राशीच्या जीवनात सुख-शांती राहील, धार्मिक कार्यात मन रमेल; 'असा' आहे आजचा दिवस
Pisces Horoscope Today 1 November 2023 : मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअर व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर राहील.
Pisces Horoscope Today 1 November 2023 : मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला राहील. आज तुमच्या घरात आणि कुटुंबात मान-सन्मान वाढू शकतो. तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खूप प्रेम करतील. कुटुंबात तुमचे नाव असेल. सर्वजण तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुमची कामे खूप दिवसांपासून रखडलेली असतील तर ती कामे आज पूर्ण होऊ शकतात. आज तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता, ज्याच्या भेटीने तुमच्या मनाला खूप शांती मिळेल आणि तुम्हाला खूप फायदाही होऊ शकतो.
आरोग्याची काळजी घ्या
तुमच्या कुटुंबातील (Family) एखाद्या सदस्याच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे तुम्ही खूप चिंतेत असाल. तुम्ही तुमच्या आरोग्याचीही (Health) विशेष काळजी घ्यावी. तुमचे आरोग्यही बिघडू शकते. डोळ्यांशी संबंधित काही समस्या असल्यास तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावेत. तुम्ही तुमच्या मुलांवर खूश राहाल. आज तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल. आज कुटुंबातील एकाद्या सदस्याच्या आठवणीने तुम्ही खूप अस्वस्थ होऊ शकता.
मीन आजचे कौटुंबिक जीवन
घर आणि कौटुंबिक बाबींमध्ये आज मीन राशीच्या लोकांना मुलं आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल. तुम्हाला कुटुंबातील वरिष्ठांकडून लाभ आणि सहकार्य मिळेल. तुम्हाला काही उत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. मंदिर किंवा पवित्र स्थळाला भेट देण्याचीही संधी मिळेल. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांशी आज फोनच्या माध्यमातून संवाद होईल. एकंदरीतच वातावरण आनंदी राहील. अविवाहित लोकांना लवकरच शुभवार्ता मिळू शकते.
मीन राशीचे आजचे आरोग्य
मीन राशीच्या लोकांना आज आरोग्याच्या (Health) बाबतीत स्वतःची काळजी घ्यावी लागेल. तुमची कोणतीही दिर्घकालीन समस्या असल्यास आज ती पुन्हा उद्भवू शकते. वाताचे विकार आणि हाडांशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात.
मीन राशीसाठी आजचे उपाय
आजच्या दिवशी नारायण कवच पठण करा. भगवान विष्णूला तुपाचा दिवा दाखवा.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :