Astrology 28 January 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, 28 जानेवारीपासून (Mauni Amavasya 2025) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. वैदिक पंचांगानुसार, पौष अमावस्या, म्हणजेच मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 रोजी आहे. ही अमावस्या 28 जानेवारीला रात्री 7 वाजून 36 मिनिटांनी सुरू होईल. धार्मिक मान्यतांनुसार, या दिवशी स्नान केल्याने सर्व पाप धुऊन जातात. योगायोगाने या दिवशी महाकुंभाचं दुसरं अमृतस्नानही होणार आहे.
मौनी अमावस्येच्या काही तास आधी सुखाचा कारक शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. 31 मे पर्यंत शुक्र मेष राशीत राहील. मीन राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे 3 राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं. शुक्र राशी परिवर्तनामुळे 28 जानेवारीपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचा राशी बदल खूप फायद्याचा ठरू शकतो. या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकतं. नोकरदारांची प्रगती होईल, त्यांना त्यांच्या कामात यश मिळेल. पदोन्नतीचीही शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना परदेशाशी संबंधित उत्पादन विस्ताराच्या नवीन संधी मिळू शकतात. तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवू शकाल. हळूहळू सर्व समस्या दूर होतील. मन प्रसन्न राहील.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र संक्रमणाचा काळ प्रगतीचा असेल. करिअरमध्ये तुम्हाला उत्तुंग यश मिळेल. जर तुम्ही कोणत्याही परदेशी कंपनीसोबत काम करत असाल तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाण्याची योजना आखू शकता, ज्यामुळे नात्यात अधिक गोडवा येईल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ सुख-सुविधांमध्ये वाढीचा असेल. या काळात तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल. नशीबही तुमच्या बाजूने असेल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. व्यावसायिकांसाठी काळ पूर्वीपेक्षा चांगला राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. लव्ह लाईफला चार चाँद लागतील. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला मदत मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: