Shani Dev : पुढचे 59 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
शनीच्या वाईट प्रकोपाला सर्वच जण घाबरतात. ज्योतिषशास्त्रात शनि हा क्रूर आणि कठोर ग्रह म्हणून ओळखला जातो, यामुळेच शनीला सर्वजण घाबरतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवाचा आशीर्वाद आपल्यावर असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. शनीचा आशीर्वाद असेल तरच सर्व गोष्टी सुफळ संपन्न होतील, असा अनेकांचा समज असतो.
यातच तब्बल दीड वर्षांनंतर शनि रास बदलणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनानंतर अनेक राशींना चांगले दिवस येतील, तर काही राशींना साडेसातीचा सामना करावा लागेल. 28 मार्च 2025 रोजी शनि मीन राशीत प्रवेश करेल, सध्या तो स्वत:च्या कुंभ राशीत आहे.
शनि कुंभ राशीत असेपर्यंतचा 59 दिवसांचा काळ काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे, या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
सिंह रास (Leo) : 28 मार्चपर्यंतचा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी सुखाचा असेल. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. कामात तुमची प्रगती होऊ शकते, नोकरदारांचा पगार वाढू शकतो.
व्यावसायिकांना या काळात विशेष लाभ मिळतील, तुम्ही आणखी काहीतरी नवीन सुरू करू शकता जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पती-पत्नीमधील संबंध सुधारतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यश मिळवण्याच्या नवीन संधी प्राप्त होतील.
मेष रास (Aries) : शनीची कुंभ राशीतील उपस्थिती मेष राशीसाठी विशेष फलदायी ठरेल. पुढील 59 दिवस तुमच्यासाठी सुखाचे आणि आनंदाचे असतील. या काळात तुमच्या संपत्तीत अपार वाढ होण्याची शक्यता आहे. घर खरेदीची योजना तुम्ही बनवू शकता.
या काळात अनावश्यक तणावापासून दूर राहिल्यास तुम्हाला यश मिळू शकतं. व्यापाऱ्यांना व्यवसायात डबल फायदा होऊ शकतो. नोकरदारांना मार्चच्या शेवटपर्यंत प्रमोशन मिळू शकतं. या काळात तुमचे प्रेमसंबंध चांगले राहतील. तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
तूळ रास (Libra) : तूळ राशीच्या लोकांना शनीच्या कुंभ राशीतील उपस्थितीचा विशेष फायदा होईल. पुढचा 59 दिवसांचा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी खूप भाग्याचा ठरेल. तुम्ही वाहन, मालमत्ता किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता.
तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. नोकरदार लोकांसाठी देखील वेळ चांगला राहील, या काळात पदोन्नतीसह तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. अविवाहितांचा विवाह होण्याची शक्यता आहे. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)