Pahalgam Terror Attack: ग्रहांची 'अशा' अनिष्ट युतीमुळे दहशतवाद, हिंसक घटनांमध्ये होतेय वाढ? परिस्थिती सामान्य कधीपर्यंत होणार? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Pahalgam Terror Attack: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा ग्रहांच्या संयोगाने धोकादायक संयोग निर्माण होतो, तेव्हा हिंसक घटना घडण्याची शक्यता अधिक असते. परिस्थिती सामान्य कधीपर्यंत होणार? जाणून घ्या

Pahalgam Terror Attack: ज्योतिषशास्त्रानुसार, देश-विदेशात घडणाऱ्या दहशतवादी कारवाया, नैसर्गिक आपत्तींमध्ये ग्रहांच्या हालचालीचा महत्त्वाचा वाटा आहे. नुकतेच मार्चमध्ये शनिने मीन राशीत प्रवेश केला होता. त्याचा परिणाम अनेक राशींवर पाहायला मिळाला, ज्योतिषींच्या मते 2 दिवसांपूर्वी काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे ग्रह-ताऱ्यांची अनिष्ट युती असण्याची शक्यता आहे. या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्योतिषींच्या मते, घडत असलेल्या दहशतवादी कारवाया, नैसर्गिक आपत्तींमध्ये ग्रहांच्या हालचालीचा महत्त्वाचा वाटा आहे. असे मानले जाते की, जेव्हा जेव्हा ग्रहांचा धोकादायक संयोग निर्माण होतो, तेव्हा हिंसक घटना घडण्याची शक्यता अधिक असते. जाणून घेऊया या हिंसक घटनांमागील ज्योतिषीय कारण काय?
22 एप्रिलला ग्रहांचा दुर्मिळ संयोग ठरला चिंताजनक!
ज्योतिषशास्त्रानुसार, 29 मार्च रोजी शनीचा मीन राशीत प्रवेश केला होता. तसं पाहायला गेलं तर शनीच्या मीन राशीत प्रवेश करण्याच्या एक दिवस आधी भूकंपाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याच वेळी, 22 एप्रिल रोजी एक अत्यंत असा अशुभ संयोग तयार झाला की ज्याचा नुकसानदायक परिणाम संपूर्ण जगावर पाहायला मिळाला. या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीत होता. तसेच मीन राशीत बसलेला राहू आणि शनि दोघांनी मिळून चांडाळ योग तयार होत होता. कर्क राशीतील मंगळ हिंसक प्रवृत्तींना चालना देतो. तर मकर राशीत चंद्र असणे हे देखील उग्रतेचे प्रतीक आहे. त्यामुळे अशा घटना वाढण्याची शक्यता आहे.
कधीपर्यंत परिस्थिती सामान्य होणार? हा योग किती दिवस टिकेल?
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाने मीन राशीत प्रवेश केल्यापासून नैसर्गिक आपत्ती आणि हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. मीन राशीत शनी आणि राहूची युती 18 मे पर्यंत राहील. त्यानंतर राहू कुंभ राशीत प्रवेश करेल. राहू कुंभ राशीत प्रवेश करताच परिस्थिती थोडी सामान्य होऊ शकते. असे मानले जाते की, शनि आणि राहूच्या संयोगामुळे छुपे षड्यंत्र, कपट आणि दहशतवादी मानसिकता, आपत्ती येण्याची शक्यताही वाढते.
भारताच्या कुंडलीत मीन 11व्या घरात, अनपेक्षित घटना घडू शकतात?
ज्योतिषशास्त्रानुसार, भारताचे स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री 12:00 वाजता नवी दिल्ली येथे मिळाले. याच्या कुंडलीनुसार मीन 11व्या घरात येतो. कुंडलीतील अकरावे घर सामाजिक, उत्पन्न आणि मित्रांशी संबंधित आहे. मीन राशीतील राहू भ्रम, कपट आणि छुपे षड्यंत्र दर्शवितो. राहूचा प्रभाव दहशतवादी कारवाया आणि अराजकतेशी संबंधित आहे. 22 एप्रिल रोजी बुध, शुक्र, राहू आणि शनि मीन राशीत होते. या संयोगामुळे सामाजिक अस्थिरता आणि पर्यटन स्थळांवर अनपेक्षित घटना घडू शकतात. यामुळेच देशात संतापाचे वातावरण आहे.
हेही वाचा :




















