Numerology Of Mulank 5 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतं. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन (Numerology) त्या व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी समजतात. तर आज आपण 5 मूलांकाच्या जन्मतारखांबद्दल बोलणार आहेत, या मुलांकाचा स्वामी बुध आहे. 


ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 5 असते. 5, 14 किंवा 23 जन्मतारखेची मुलं थोडी लाजाळू स्वभावाची असतात. तसेच, ही मुलं त्यांच्या भावना इतरांसमोर व्यक्त करू शकत नाहीत. पण हे लोक चांगले उद्योगपती बनतात, शिवाय त्यांचं बोलणं खूप प्रभावी असतं. या मूलांकाच्या मुलांबद्दल अधिक जाणून घेऊया.


खूप लाजाळू असतात या जन्मतारखेची मुलं


अंकशास्त्रानुसार, 5, 14 किंवा 23 जन्मतारिख असणारी मुलं थोडी लाजाळू स्वभावाची असतात आणि त्यांना पटकन एखाद्यासमोर त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत. कुणाच्या भीतीने नाही, तर लाजाळूपणामुळे ते असं वागतात. ही मुलं कलेचे जाणकार असतात आणि कलेवर प्रेम करतात. शिवाय, ही मुलं व्यावहारिक देखील असतात. त्याचबरोबर ते बुद्धिमान असतात आणि त्यांच्याकडे दूरदृष्टीही असते. मूलांक 5 चे लोक पै पै करुन आपली संपत्ती जोडतात, तसेच ते चांगला बँक बॅलन्स देखील राखतात.


भविष्यात मोठे उद्योगपती बनतात


ज्यांचा मूलांक 5 आहे असे लोक मोठे उद्योगपती बनतात. हे लोक अल्पावधीतच मोठं साम्राज्य निर्माण करतात. व्यवसायात नवीन कल्पना वापरून भरपूर पैसा कमावतात. याशिवाय हे लोक मनी माइंडेड असतात. त्याच वेळी, हे लोक त्यांच्या कामाच्या बाबतीत थोडे निष्काळजी असतात. हे लोक तर्कशुद्धही असतात. त्यांची संभाषण शैली प्रभावशाली असते आणि एकदा कोणी माणूस त्यांना भेटला की तो त्यांच्या कायम लक्षात राहतो. या लोकांचे मित्रमंडळ मोठे असते.


या मुलांसाठी हे दिवस अत्यंत शुभ


जर 5 मूलांकाशी संबंधित लोकांच्या शुभ अंकांबद्दल बोलायचं झालं तर, या लोकांसाठी 5, 14 आणि 23 तारखा अत्यंत शुभ आहेत . म्हणजेच या तारखांना हे लोक काही शुभ कार्य सुरू करू शकतात. तर शुक्रवार आणि बुधवार हे दिवस त्यांच्यासाठी शुभ मानले जातात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Numerology : प्रचंड हुशार आणि चतुर असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जिथे जातात तिथे होतं यांचं कौतुक