Numerology of Moolank 5 : अंकशास्त्रानुसार, तुम्ही ज्या जन्मतारखेला जन्म घेता त्या जन्मतारखेचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. अंकशास्त्रात 1 ते 9 अंक आहेत आणि या प्रत्येक अंकाचा स्वामी एक विशिष्ट ग्रह आहे. अंकशास्त्रात (Numerology) 5 हा अंक खूप खास मानला जातो. कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 5 असतो.
मूलांक 5 चा स्वामी बुध ग्रह आहे, जो बुद्धिदाता आणि व्यापाराशी संबंधित आहे. त्यामुळेच 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक बुद्धिमान आणि हुशार असतात. याशिवाय, हे लोक मोठे उद्योगपती बनतात आणि कामाच्या ठिकाणी त्यांचं खूप कौतुक केलं जातं. या मूलांकाशी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
प्रचंड श्रीमंत आणि मोठे उद्योगपती बनतात
अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक 5 आहे, ते लोक मोठे उद्योगपती बनतात. तसेच, हे लोक जीवनात भरपूर पैसा कमावतात. हे लोक व्यवसायात आपल्या डोक्याचा वापर करून भरपूर पैसा कमावतात. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून ते कठिणातल्या कठीण समस्येतून बाहेर पडतात. त्यांची विनोदबुद्धीही खूप चांगली असते. हे लोक मेहनती असतात.
कामाच्या ठिकाणी कामाचं होतं खूप कौतुक
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक 5 असतो, ते लोक त्यांच्या नोकरी-व्यवसायात खूप मेहनत घेतात, त्यामुळे या लोकांची कामाच्या ठिकाणी वाहवा होते. तसेच हे लोक स्वभावाने खूप बोलके असतात. शिवाय, ते आपल्या शब्दांनी इतरांना पटकन प्रभावित करतात. एवढंच नाही तर, या लोकांचं व्यक्तिमत्त्वही आकर्षक असतं. हे लोक विनोदी स्वभावाचे असतात.
अशी असते लव्ह लाईफ
5, 14 किंवा 23 तारखेला जन्मतारखेच्या लोकांची लव्ह लाईफ थोडी विस्कळीत राहते. या लोकांचे लग्नापूर्वी अनेक अफेअर्स असतात. तसेच या लोकांचे प्रेमसंबंध जास्त काळ टिकत नाहीत, पण लग्नानंतर त्यांचं आयुष्य चांगलं राहतं. मूलांक 5 चे लोक त्यांचं वैवाहिक जीवन फुलवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या जोडीदाराची खूप काळजी घेतात.
नेहमी चिंतामुक्त राहतात
बुध ग्रहांमुळे मूलांक 5 असलेले व्यक्ती बुद्धिवान असतात, ते प्रत्येक गोष्ट योग्यप्रकारे समजून घेतात आणि यामुळेच एखाद्या गोष्टीचा विचार करून ते जास्त खुशही होत नाहीत आणि दु:खीही होत नाहीत. यामुळेच ते कधी कोणत्या गोष्टीची जास्त चिंता करत नाही आणि मानसिक ताण ओढवून घेत नाहीत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :