Numerology : स्वत:च्या हिंमतीवर सर्व साम्राज्य उभारतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणाच्याही पुढे हात पसरवण्याची भासत नाही यांना गरज
Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक स्वत:च्या पायावर उभे राहतात, त्यांना कधीच कुणाची मदत घ्यायला आवडत नाही. स्वबळावर ते सर्व साम्राज्य उभारतात.
Numerology Of Mulank 8 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतं. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन (Numerology) त्या व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी समजतात. तर आज आपण 8 मूलांकाच्या जन्मतारखांबद्दल बोलणार आहेत, या मुलांकाचा स्वामी शनि (Shani) आहे.
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 8 असते. हे लोक रहस्यमयी स्वभावाचे असतात, त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललं असेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. याशिवाय, हे लोक खूप मेहनती देखील असतात आणि स्वबळावर प्रगतीच्या शिखरावर चढतात. 8, 17 किंवा 26 जन्मतारखेच्या लोकांना समाजात खूप मान मिळतो.
शनीची कृपादृष्टी राहते कायम
अंकशास्त्रानुसार मूलांक 8 च्या लोकांवर शनिदेव आपली कृपा सदैव ठेवतात. तसेच, मूलांक 8 असलेले लोक खूप प्रामाणिक आणि मेहनती असतात. याशिवाय, ते नेहमी इतरांना मदत करतात आणि सत्याचं समर्थन करतात.
ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करुनच राहतात
कोणतंही काम पूर्ण केल्यावरच त्यांचं मन शांत होतं. ठरवलेलं ध्येय गाठल्यावरच त्यांच्या मनाचं समाधान होतं. तसेच हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. प्रत्येक काम मेहनतीने केल्यामुळे त्यांना यश हे मिळतंच. मात्र, जीवनात यशस्वी होऊनही हे लोक अगदी सामान्य जीवन जगतात. हे लोक अतिशय गंभीर आणि शांत स्वभावाचे असतात.
या जन्मतारखेच्या लोकांना खालील क्षेत्रांमध्ये मिळतं यश
अंकशास्त्रानुसार, 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक मुख्यतः इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम करतात. हे लोक चांगले उद्योगपती देखील होऊ शकतात. बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, लोखंड आणि तेलासंबंधित वस्तूंशी संबंधित व्यवसाय त्यांना अधिक नफा देणारा ठरतो. हे लोक पोलीस किंवा लष्करी सेवांमध्येही काम करतात. याशिवाय हे लोक संशोधन क्षेत्रातही चांगलं नाव कमावतात.
यांच्या लव्ह लाईफमध्ये येतात अडचणी
मूलांक 8 असलेल्या लोकांचे प्रेम संबंध कायम राहत नाहीत, त्यांचे प्रेम संबंध जास्त काळ टिकत नाहीत. काहीवेळा ते आपलं प्रेम हृदयातच ठेवतात आणि ते त्या ठराविक व्यक्तीसमोर व्यक्त करू शकत नाही. 8, 17 किंवा 26 जन्मतारखेच्या लोकांचं लग्न सहसा उशिरा होतं, वैवाहिक जीवनातही जोडीदारासोबत त्यांचे वाद होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Numerology : खूपच लाजाळू असतात 'या' जन्मतारखेची मुलं; यांना मनातील भावनाही धड करता येत नाही व्यक्त