Numerology Mulank 7 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 7 असलेल्या लोकांचं वैशिष्ट्य फार हटके आहे.


मूलांक 7 चे लोक स्वभावाने फार चंचल असतात, त्यांना कधीच शांत बसवत नाही. दुसऱ्यांच्या खोडी काढणं यांना फार आवडतं. परंतु, यासोबतच या जन्मतारखेचे लोक डोक्याने फार हुशार देखील असतात. याच सोबत संपत्ती, जमीन, मालमत्तेच्या बाबतीत देखील ते खूप भाग्यवान असतात. अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 च्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. बुधाच्या वर्चस्वामुळे 7 मूलांकाचे लोक बुद्धी, वाणी, व्‍यवसायाच्या बाबतीत हुशार असतात.


प्रचंड वात्रट असतात 'या' जन्मतारखेचे लोक


मूलांत 7 असलेले लोक स्वभावाने फार खोडकर असतात, त्यांना इतरांची थट्टा-मस्करी करायला देखील आवडतं. ते समोरच्या व्यक्तीच्या खोडी काढतच राहतात, त्यांना कधी शांत बसवत नाही. हे लोक बोलण्यात खूप चतुर आसतात आणि त्यांच्या याच स्वभावामुळे ते इतरांना स्वत:कडे आकर्षित करतात. 


अतिशय बुद्धिमान असतात हे लोक


7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक खूप बुद्धिमान असतात. ते आपल्या वाणीच्या आणि बुद्धीच्या जोरावर सगळी कामं पूर्ण करतात. या कारणास्तव हे लोक नोकरी असो किंवा व्यवसाय असो, या दोन्हीमध्ये चांगलं यश मिळवतात.  या लोकांना कमी मेहनत करूनही आयुष्यात अधिक यश मिळतं.


धाडसी कामं करणं यांना आवडतं


मूलांक 7 चे  लोक खूप धाडसी असतात आणि ते कोणत्याच आव्हानांना घाबरत नाहीत. ते आपल्या बुद्धीने आणि धैर्याने प्रत्येक आव्हानावर मात करतात. धाडसी गोष्टी करायला यांना खूप आवडतं, त्यांचं मन कधीच शांत राहत नाही. सतत काहीतरी वेगळं करण्याची इच्छा यांना होते आणि त्या दिशेने ते हातपाय हलवत राहतात.


कमावतात बक्कळ पैसा


जर आपण मूलांक 7 च्या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर, हे लोक खूप श्रीमंत असतात. हे लोक नोकरी आणि व्यवसायातून बक्कळ पैसा कमावतात. जर ते व्यवसायात घुसले तर त्यांना नशिबाची साथ मिळते आणि ते खूप श्रीमंत होतात. 


कुटुंबासाठीही ठरतात भाग्यवान


अंकशास्त्रानुसार, 7 मूलांक असलेले लोक स्वतःसाठी तसेच त्यांच्या कुटुंबासाठीही भाग्यवान सिद्ध होतात. त्यांच्या जन्मानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू लागते. यांच्या पायगुणामुळे घरात सुख-समृद्धी आणि संपत्ती वाढते.


स्वतंत्र विचारांचे असतात हे लोक 


अंकशास्त्रानुसार मूलांक 7 असलेले लोक स्वतंत्र विचारांचे असतात. हे लोक कधीही कोणाच्याही दबावाखाली येत नाहीत. त्यांना मुक्त विचारांवर आयुष्य जगायला आवडतं. त्यांना एखाद्या व्यक्तीचं बोलणं पटलं नाही तरी ते तोंडावर व्यक्त होतात.


प्रेमसंबंधात येतात अडचणी


मूलांक 7 असलेल्या लोकांचे त्यांच्या भावंड आणि कुटुंबाशी चांगले संबंध असतात. पण प्रेमाच्या बाबतीत त्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यांच्या प्रेम जीवनात स्थिरता नसते आणि ते पटकन एखाद्याकडे आकर्षित होतात आणि त्याला आपलं सर्वस्व समजून त्याच्यावर विश्वास ठेवतात. परंतु पुढे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology : पटकन हायपर होतात 'या' जन्मतारखेचे लोक ; नेहमी असतो नाकाच्या शेंड्यावर राग