एक्स्प्लोर

Numerology : अतिशय आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर

Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक फार आळशी असतात. आजचं काम उद्यावर ढकलण्याची सवय त्यांना असते. त्यांच्या आळसामुळे हुशार असूनही ते यशाच्या मार्गावर मागे पडतात.

Numerology Mulank 7 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 7 असलेल्या लोकांचं देखील खास वैशिष्ट्य सांगितलं गेलं आहे. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.

मूलांक 7 चा शासक ग्रह केतू आहे. त्यामुळे त्यांच्यावर केतूचा आशीर्वाद असतो, या जन्मतारखेचे लोक आळशी असले तरी ते अद्भूत व्यक्तिमत्त्वाचे असतात. या मूलांकाशी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

अत्यंत आळशी असतात या जन्मतारखेचे लोक

7, 16 किंवा 25 जन्मतारखेचे लोक हे अतिशय आळशी असतात. रेंगाळत सगळी कामं करण्याची सवय यांना असते. प्रत्येक कामाचा त्यांना आळस आलेला असतो, म्हणूनच ते सगळ्या गोष्टींत मागे पडतात. हे लोक हुशार असतात, परंतु त्यांच्या आळसामुळे यश त्यांच्याकडे लवकर चालून येत नाही. यशाची पायरी चढायला यांना काहीसा वेळ लागतो. आजचं काम उद्यावर टाकण्याची सवय यांना भारी पडते, त्यांच्या या स्वभावामुळे कधी-कधी आलेल्या संधीही त्यांच्या हातून निसटून जातात.

एकदा घराबाहेर पडले की होतात सक्रिय

मूलांक 7 चे लोकांचं व्यक्तिमत्त्व हे पांडासारखं असतं. त्यांना आराम करायला एखादी जागा मिळाली तर ते तिथेच रेंगाळत राहतात. परंतु एकदा घराबाहेर पडले की हे लोक लगेच अॅक्टिव्ह होतात. नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करणं यांना आवडतं. 

अतिशय बुद्धिमान असतात हे लोक

7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक खूप बुद्धिमान असतात. ते आपल्या वाणीच्या आणि बुद्धीच्या जोरावर सगळी कामं पूर्ण करतात, भलेही ती कामं करायला ते थोडा उशीर करत असतील. कामात हे लोक स्मार्ट असतात, नोकरी असो किंवा व्यवसाय, या दोन्हीमध्ये ते चांगलं यश मिळवतात. या लोकांना कमी मेहनत करूनही आयुष्यात अधिक यश मिळतं.

धाडसी कामं करणं यांना आवडतं

मूलांक 7 चे  लोक खूप धाडसी असतात आणि ते कोणत्याच आव्हानांना घाबरत नाहीत. ते आपल्या बुद्धीने आणि धैर्याने प्रत्येक आव्हानावर मात करतात. धाडसी गोष्टी करायला यांना खूप आवडतं, त्यांचं मन कधीच शांत राहत नाही. सतत काहीतरी वेगळं करण्याची इच्छा यांना होते आणि त्या दिशेने ते हातपाय हलवत राहतात.

प्रेमसंबंधात येतात अडचणी

अद्भुत व्यक्तिमत्त्व असूनही प्रेम आणि मैत्रीमध्ये या लोकांची अनेकदा फसवणूक होते. या लोकांचे प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत. हे लोक प्रेमाचा आव आणत नाहीत, तर खऱ्या मनाने प्रेम करतात. हे लोक आपल्या जोडीदाराला शेवटच्या क्षणापर्यंत साथ देतात. या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते. मूलांक 7 चे लोक आयुष्यात कधीही हार मानत नाहीत.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Numerology : कशाचंही पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्या-छोट्या गोष्टींचा करतात अति विचार, मग यांना शांत करणं जातं कठीण

Numerology : पटकन हायपर होतात 'या' जन्मतारखेचे लोक ; नेहमी असतो नाकाच्या शेंड्यावर राग

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
Garud Puran: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget