एक्स्प्लोर

Numerology : कशाचंही पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्या-छोट्या गोष्टींचा करतात अति विचार, मग यांना शांत करणं जातं कठीण

Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक हे अगदी क्षुल्लक गोष्टींचं देखील फार टेन्शन घेतात. नको त्या गोष्टींचा अति विचार करुन ते डोक्याचा ताप वाढवून घेतात, त्यांना शांत करता करता समोरच्याला नाकेनऊ येतात.

Numerology Mulank 2 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 2 असलेल्या लोकांचं खास वैशिष्ट्य सांगितलं गेलं आहे. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.

मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे. त्यामुळे चंद्राच्या प्रभावामुळे, या मूलांकाचे लोक अत्यंत कल्पनाशील, भावनिक, दयाळू आणि साध्या मनाचे असतात. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचा ते अति विचार करतात आणि मग काहीवेळा काही गोष्टींमुळे लगेच ते टेन्शन घेतात.  या मूलांकाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

छोट्या-छोट्या गोष्टींचा अति विचार करतात

2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेचे लोक हे ओव्हरथिंकर्स असतात. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर ते तासनतास विचार करत बसतात. कोणतीही गोष्ट यांच्या डोक्यातून सहज निघत नाही. अशा परिस्थितीत यांच्यासोबत राहणाऱ्या मंडळींचा अर्धा वेळ यांना शांत करण्यात जातो, तरीही ते पटकन शांत होत नाहीत.

कोणत्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात

मूलांक 2 च्या व्यक्ती या फार ताण घेतात. नको त्या गोष्टींचा विचार करुन ते स्वत:चं टेन्शन वाढवतात. नको त्या गोष्टींना, व्यक्तींना महत्त्व दिल्याने त्यांची डोकेदुखी वाढते. अति ताण घेतल्याने याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होतो. 

आत्मविश्वासाची असते कमी

मूलांक 2 च्या काही लोकांमध्ये आत्मविश्वासाची थोडी कमतरता जाणवते. हे लोक लगेच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना पटकन काही बोलता येत नाही. तसेच त्यांचा स्वभावही सतत बदलणारा असतो. अनेक वेळा त्यांच्यात एकाग्रतेचा अभावही दिसून येतो.

स्वभावाने असतात शांत आणि सहनशील

या मूलांकाचे लोक स्वभावाने खूप शांत आणि सहनशील असतात. अगदी कठीण परिस्थिती जरी आली तरी हे लोक आपला संयम गमावत नाहीत. उलट धैर्याने परिस्थितीचा सामना करतात. या जन्मतारखेचे लोक इतरांशी समन्वय साधण्यात पटाईत असतात. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात.

नोकरी-व्यवसायात नाव कमावतात

मूलांक क्रमांक 2 असलेले लोक नोकरी-व्यवसायात खूप नाव कमावतात. ते संगीत, गायन, लेखन, कला इत्यादी क्षेत्रातही चांगली कामगिरी करतात. मृदुभाषी असल्या कारणाने या लोकांची समाजात चांगली प्रतिमा निर्माण होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Numerology : पटकन हायपर होतात 'या' जन्मतारखेचे लोक ; नेहमी असतो नाकाच्या शेंड्यावर राग  

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Shani Gochar 2026 : सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर
सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर
Garud Puran : पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
Horoscope Today 11 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Embed widget