(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Numerology : फारच रोमँटिक असतात 'या' जन्मतारखेची मुलं; जोडीदाराला ठेवतात नेहमी खुश, महागड्या गोष्टींचा असतो यांना शौक
Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेची मुलं फार रोमँटिक असतात. ते त्यांच्या रिलेशनमध्ये एक स्पार्क जागा ठेवतात. जोडीदाराच्या पडत्या काळात ते खंबीर उभे राहतात आणि साथ देतात.
Numerology Mulank 6 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 6 असलेल्या लोकांबद्दल काही खास वैशिष्ट्यं सांगितली गेली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो.
मूलांक 6 चा स्वामी शुक्र आहे. 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या मुलांवर शुक्राचा प्रभाव असतो. या जन्मतारखेची मुलं फार रोमँटिक (Romantic) असतात, या मुलांचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं. तसेच ही मुलं आपल्या बोलण्याने आणि वागण्याने कोणाचंही लक्ष वेधून घेण्यात माहीर असतात. तसेच शुक्राच्या प्रभावामुळे ही मुलं जीवनात खूप नाव आणि पैसा कमावतात. या मूलांकाशी (Numerology) संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
फार रोमँटिक असतात 'या' जन्मतारखेची मुलं
मूलांक 6 चा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा प्रेम आणि शांतीचा प्रतीक मानला जातो. मूलांक 6 ची मुलं दिसायला आकर्षक आणि मजबूत शरीरयष्टीची असतात. ही मुलं स्वभावाने फार रोमँटिक असतात. या लोकांचं वृद्धत्व लवकर दिसून येत नाही. ते त्यांच्या पहिल्या भेटीत कोणालाही वेड लावू शकतात. हे लोक एखाद्याच्या सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात.
मैत्री जपणं यांच्याकडून शिकावं
6, 15 किंवा 24 जन्मतारखेचे लोक कला आणि मनोरंजन प्रेमी असतात. तसेच, हे लोक मैत्री जपण्यात उत्तम असतात. पहिल्या भेटीत हे लोक समोरच्याशी सभ्यतेने वागतात. हे लोक इतरांच्या सुख-दु:खात सोबत उभे असतात, त्यांना माणुसकी देखील तितकीच असते.
जोडीदाराला नेहमी खुश ठेवतात
हे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवतात. ते त्यांच्या रिलेशनमध्ये एक स्पार्क जागा ठेवतात. जोडीदाराच्या पडत्या काळात ते खंबीर उभे राहतात आणि साथ देतात. जोडीदाराच्या दु:खात ते त्याची सोबत देतात आणि तिला शांत करतात.
महागड्या गोष्टींचा असतो शौक
मूलांक 6 च्या लोकांना वैभवशाली जीवन जगण्यास आवडतं. या लोकांचे शिक्षण चांगलं झालेलं असतं. ते त्यांच्या मेहनतीने भरपूर पैसाही कमावतात. मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतात. त्यांना पैसे खर्च करण्याचीही आवड असते. याशिवाय या लोकांना महागड्या वस्तू खरेदीचा शौक असतो. त्यांना सुखी लॅव्हिश जीवन जगायला आवडतं.
या लोकांना जीवनातील सर्व सुख-सुविधा मिळतात. हे लोक लहानपणापासूनच आपल्या करिअरचा विचार करायला लागतात आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतात. त्यांना प्रवासाची खूप आवड असते. या शिवाय त्यांना विविध प्रकारचे नवनवीन कपडे घालण्याची आवड असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :