Numerology Mulank 5 : अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा स्वभाव सांगितला जातो. कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून (Numerology) कळू शकतं. मूलांकावरुन व्यक्तीचा स्वभाव कळतो. तर आज आपण टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि त्याच्या मूलांकाच्या इतर व्यक्तींबद्दल देखील जाणून घेणार आहोत.


इंडियन क्रिकेट टीमचा नवीन कोच गौतम गंभीर याचा जन्म 14 ऑक्टोबर 1981 रोजी झाला. गौतम गंभीरचा मूलांक 5 आहे. अंकशास्त्रात मूलांक 5 बद्दल काही खास वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. 


मूलांक 5 चा स्वामी बुध आहे. 5, 14 किंवा 23 जन्मतारखेला जन्मलेले व्यक्ती खूप हुशार, धाडसी आणि मेहनती असतात. यांना प्रत्येक कामात परफेक्शन लागतं आणि या व्यक्ती वेळेच्या पक्क्या असतात, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कामं न झाल्यास त्यांना पटकन राग येतो आणि ते चिडतात. या व्यक्ती प्रत्येक गोष्टीचा गांभीर्याने विचार करतात. या मूलांकाशी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.


प्रत्येक कामात लागतं यांना परफेक्शन


5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक प्रत्येक काम झोकून देऊन करतात. या व्यक्ती प्रचंड मेहनती असतात आणि आपल्याप्रमाणे दुसऱ्यांनीही तितक्याच चिकाटीने कामं करावी, अशी त्यांची इच्छा असते. मूलांक 5 च्या लोकांना प्रत्येक कामात परफेक्शन लागतं आणि जर ते मिळालं नाही तर यांची चिडचिड होते. प्रत्येक काम गंभीरतेने घेणं ही यांची सवय असते.


वेळेचे पक्के असतात या जन्मतारखेचे लोक


मूलांक 5 चे लोक शिस्तप्रिय असतात. प्रत्येक काम हे ठरवल्याप्रमाणे आणि दिलेल्या वेळेत पूर्ण व्हावं, असा यांचा मानस असतो. या व्यक्ती स्वभावाने मुळातच शांत आणि तितकेच गंभीर असतात. एखाद्या कामात एखाद्याने हलगर्जीपणा केल्यास या व्यक्ती रागवतात. प्रत्येकाने आपलं काम गंभीरतेने आणि अचूकतेने करावं, अशी यांची इच्छा असते. अल्लड स्वभावाच्या व्यक्ती या लोकांना पटत नाहीत.


ठरवलं ते मिळवूनच राहतात


 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक आत्मविश्वासाने भरलेले असतात आणि ते कोणत्याही गोष्टीत सहज यश मिळवतात. हे लोक जन्मजात जिज्ञासू असतात आणि नवीन गोष्टी शिकण्याची ओढ त्यांना असते. ठरवलं ते मिळवून राहण्याची जिद्द यांच्यात असते. मूलांक 5 च्या व्यक्तींची स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण असते आणि त्यांना गोष्टी लवकर समजतात.आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती करतात.


जोखीम घेण्यास घाबरत नाहीत 


या लोकांची कल्पनाशक्ती अप्रतिम असते. हे लोक कला, संगीत, क्रीडा आणि लेखन यासारख्या क्षेत्रात यशस्वी होतात. हे लोक जोखीम घेण्यास घाबरत नाहीत आणि नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी नेहमी तयार असतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology : प्रचंड गर्विष्ठ असतात 'या' जन्मतारखेचे लोक, स्वत:ला समजतात अतिशहाणे; दुसऱ्यांवर टीका करायला सर्वात पुढे