Numerology Mulank 2 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 2 असलेल्या लोकांची देखील काही वैशिष्ट्यं सांगितली गेली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.


मूलांक 2 चे लोक अत्यंत निष्पाप आणि निरागस असतात, ते एकदम निर्मळ मनाचे असतात. कपटीपणा आणि लोकांची फसवणूक, खोटं बोलणं यांच्या रक्तात नसतं. मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र (Moon) आहे, त्यामुळे स्वभावाने ते चंद्रासारखेच कोमल असतात. 2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेचे लोक अत्यंत अल्लड असतात, त्यामुळे कधीकधी लोक यांच्या स्वभावाचा फायदा घेतात. मूलांक 2 शी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.


अत्यंत साधेभोळे असतात या जन्मतारखेचे लोक


कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक हे स्वभावाने अत्यंत निरागस आणि साधे असतात. हे लोक निर्मळ मनाचे असतात. त्यांना छळ, कपट, फसवणूक समजत नाही आणि अशा त्यामुळेच ते स्वत:ही अशा गोष्टी करण्याच्या भानगडीत पडत नाहीत.


दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच असतात तत्पर


मूलांक 2 चे लोक दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच एक पाऊल पुढे असतात. एखादा व्यक्ती संकटात असेल किंवा त्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल तर ते त्याला लगेच मदत करतात. समोरचा व्यक्ती एखाद्या संकटात असेल तर यांना लगेच वाईट वाटतं आणि ते त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावतात. कधीकधी त्यांच्या याच स्वभावाचा काही लोक फायदा घेतात. 


एखाद्याने रचलेलं षडयंत्रही यांना समजत नाही


 2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेच्या लोकांना माणसं लगेच समजत नाहीत, ते प्रत्येकावर विश्वास ठेवतात आणि मग त्यांची फसवणूक होते. या जन्मतारखेचे लोक प्रत्येकालाच स्वत:सारखे चांगल्या मनाचे समजतात आणि आपल्या गोष्टी लगेच शेअर करतात, कधीतरी एकदाच त्यांना त्यांच्या अशा स्वभावाचा फटका बसतो आणि थोडे दिवस ते शांत राहतात. पुन्हा त्यांचं येरे माझ्या मागल्या सुरुच राहतं.


कामात अपयश आल्यास लगेच होतात निराश


मूलांक 2 असलेल्या लोकांना एखाद्या कामात यश न मिळाल्यास ते लगेच निराश होतात. अपेक्षित असलेली गोष्ट साध्य झाली नाही तर ते लगेच खचून जातात आणि त्यांना पुन्हा उभारी घेण्यासाठी वेळ लागतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology : भयंकर हट्टी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; ठरवलं ते करुनच राहतात, त्याशिवाय यांचं डोकं होत नाही शांत


Numerology : नेहमी स्वत:च्या तंद्रीतच असतात 'या' जन्मतारखेचे लोक; ना घेत कसलं टेन्शन, ना देत कोणाला त्रास, एकदम मजेशीर असतो यांचा स्वभाव