Numerology Mulank 1 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 1 च्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.  


मूलांक 1 चे लोक हे स्वभावाने गर्विष्ठ आणि कधीकधी हट्टी देखील असतात. आपल्यालाच जणू सर्व काही माहीत असल्याचं त्यांना वाटतं, समोरच्या व्यक्तीला ते कमी लेखतात. या मूलांकाच्या लोकांमध्ये श्रवण क्षमता कमी असते. या मूलांक संख्येबद्दल अधिक जाणून घेऊया.


अत्यंत घमंडी असतात या जन्मतारखेचे लोक


मूलांक 1 चे लोक फार गर्विष्ठ असतात. ते नेहमी ताठ मानेने चालतात आणि दुसऱ्यांना कमी लेखतात. समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता त्यांच्यात नसते. आपणच शाहणे आणि समोरचा संथ असा रोख त्यांचा असतो. हे लोक नेहमीच इतरांवर टीका करू शकतात आणि या लोकांना एकटेपणाची भीती वाटते.


अतिशय धाडसी असतात हे लोक


कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेले लोक त्यांच्या मेहनतीने आणि क्षमतेने सरकारी नोकरी मिळवण्यात यशस्वी होतात आणि त्यांच्या टीमचं नेतृत्व देखील करतात. हे लोक धाडसी असतात आणि धोका पत्करणारे असतात. हे लोक अतिशय शिस्तबद्ध असतात आणि या गुणामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात.


प्रत्येक क्षेत्रात मिळवतात यश


या मूलांकाच्या लोकांमध्ये सरकारी अधिकारी बनण्याची क्षमता असली तरी, या मूलांकाचे काही लोक चांगले नेतेही बनतात. याशिवाय, हे लोक इलेक्ट्रॉनिक, फॉरेन कंपनी, संशोधन कार्य, विद्युत संबंधित व्यवसाय आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ते काम करतात आणि तिथे प्रगती साधतात. हे लोक कला, संगीत, लेखन आणि डिझाईन यांसारख्या क्षेत्रातही यश मिळवतात.


इतर लोक यांना प्रेरणा मानतात


मूलांक 1 असलेले लोक त्यांच्या जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जातात, परंतु त्यांच्या दृढनिश्चयाने आणि आत्मविश्वासाने त्यावर मात करतात. या मूलांकाचे लोक इतरांसाठी प्रेरणास्थान बनतात आणि जगात सकारात्मक बदल घडवून आणतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Numerology : अत्यंत बालिश असतात 'या' जन्मतारखेच्या मुली; कितीही मोठ्या झाल्या तरी यांचा अल्लडपणा जात नाही, प्रत्येक गोष्ट सांगावी लागते समजावून