Numerology Mulank 3 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 3 असलेल्या लोकांचं वैशिष्ट्य खूप खास आहे. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 जन्मलेल्या मुलींचा मूलांक 3 असतो.
मूलांक 3 हा बृहस्पति ग्रहाशी संबंधित आहे. या मूलांकाचे (Numerology) लोक मनाने चलबिचल असतात आणि यांचे प्रेमसंबंध जास्त टिकत नाहीत. अंकशास्त्रानुसार, या मुलींची आर्थिक स्थिती तितकी चांगली नसते, सुरुवातीला त्या घरच्यांवर अवलंबून असतात. पण वाढत्या वयाबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुधारू लागते. या मूलांकाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
एकवचनी स्वभाव यांना ठाऊक नाही
3, 12, 21 किंवा 30 जन्मतारखेच्या मुलींची लव्ह लाईफ काहीशी किचकट असते. त्या दिलेल्या शब्दाला जागत नाहीत. मूलांक 3 च्या मुली एकवचनी नसतात, त्यांचे एकापेक्षा अनेक प्रेमसंबंध होतात. प्रेमसंबंधांत सुरुवातीला त्या फार गोडीगुलाबीने राहतात, मात्र नंतर प्रियकराला सोडून निघून जातात. या मुलींचे प्रेम संबंध कायम राहत नाहीत, परंतु त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते.
काहीवेळा एकापेक्षा अधिक लग्न होतात
मूलांक 3 च्या मुलींची काहीवेळा एकापेक्षा जास्त लग्नं झालेली दिसतात, त्यापैकी त्यांचं पहिलं लग्न हे नेहमी फसतं आणि त्रासदायक ठरतं. यानंतर ते दुसऱ्या लग्नाकडे वळतात.
स्वभावाने फार चंचल असतात या मुली
मूलांक 3 असलेल्या मुली एका जागी स्थिर नसतात, त्यांचं मन कोणत्या तरी एका गोष्टीत लागत नाही. त्यांचे मित्र देखील अनेक असतात. प्रियकर देखील एकापेक्षा अधिक असतात.
उच्च शिक्षण घेतात
मूलांक 3 असलेल्या मुली सहसा उच्च शिक्षण घेतात, त्या खूप अभ्यासू असतात आणि त्या वाचन आणि लेखनात हुशार असतात. त्यांना विज्ञान आणि साहित्यात खूप रस असतो, त्या अभ्यासात यशस्वी होतात.
वाढत्या वयासोबत आर्थिक स्थिती सुधारते
जर आपण त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर, त्यांच्या सुरुवातीच्या वयात त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. सुरुवातीला त्यांच्या वडिलांना त्यांच्यावर खूप खर्च करावा लागतो. पण वाढत्या वयाबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुधारू लागते. त्यांच्याकडे उत्पन्नाचे एकापेक्षा अनेक स्त्रोत येऊ लागतात. मात्र अनेकवेळा त्यांना पैसे आणि मालमत्तेशी संबंधित खटल्यांनाही सामोरं जावं लागतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: