Numerology Mulank 2 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 2 असलेल्या लोकांचं खास वैशिष्ट्य सांगितलं गेलं आहे. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.


मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे. त्यामुळे चंद्राच्या प्रभावामुळे, या मूलांकाचे लोक अत्यंत कल्पनाशील, भावनिक, दयाळू आणि साध्या मनाचे असतात. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचा ते अति विचार करतात आणि मग काहीवेळा काही गोष्टींमुळे लगेच ते टेन्शन घेतात.  या मूलांकाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


छोट्या-छोट्या गोष्टींचा अति विचार करतात


2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेचे लोक हे ओव्हरथिंकर्स असतात. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर ते तासनतास विचार करत बसतात. कोणतीही गोष्ट यांच्या डोक्यातून सहज निघत नाही. अशा परिस्थितीत यांच्यासोबत राहणाऱ्या मंडळींचा अर्धा वेळ यांना शांत करण्यात जातो, तरीही ते पटकन शांत होत नाहीत.


कोणत्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात


मूलांक 2 च्या व्यक्ती या फार ताण घेतात. नको त्या गोष्टींचा विचार करुन ते स्वत:चं टेन्शन वाढवतात. नको त्या गोष्टींना, व्यक्तींना महत्त्व दिल्याने त्यांची डोकेदुखी वाढते. अति ताण घेतल्याने याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होतो. 


आत्मविश्वासाची असते कमी


मूलांक 2 च्या काही लोकांमध्ये आत्मविश्वासाची थोडी कमतरता जाणवते. हे लोक लगेच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना पटकन काही बोलता येत नाही. तसेच त्यांचा स्वभावही सतत बदलणारा असतो. अनेक वेळा त्यांच्यात एकाग्रतेचा अभावही दिसून येतो.


स्वभावाने असतात शांत आणि सहनशील


या मूलांकाचे लोक स्वभावाने खूप शांत आणि सहनशील असतात. अगदी कठीण परिस्थिती जरी आली तरी हे लोक आपला संयम गमावत नाहीत. उलट धैर्याने परिस्थितीचा सामना करतात. या जन्मतारखेचे लोक इतरांशी समन्वय साधण्यात पटाईत असतात. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात.


नोकरी-व्यवसायात नाव कमावतात


मूलांक क्रमांक 2 असलेले लोक नोकरी-व्यवसायात खूप नाव कमावतात. ते संगीत, गायन, लेखन, कला इत्यादी क्षेत्रातही चांगली कामगिरी करतात. मृदुभाषी असल्या कारणाने या लोकांची समाजात चांगली प्रतिमा निर्माण होते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Numerology : पटकन हायपर होतात 'या' जन्मतारखेचे लोक ; नेहमी असतो नाकाच्या शेंड्यावर राग