Numerology: 'या' जन्मतारखेच्या लोकांचा आजचा दिवस रोमांचक; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचं आजचं भविष्य
Numerology Today 15 November 2023 : अंकशास्त्रात संख्यांच्या मदतीने व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते. मुलांकाद्वारे, म्हणजेच जन्मतारखेवरुन हे भविष्य समजतं, या द्वारे तुमचं आजचं भविष्य जाणून घ्या.

Numerology Today 15 November 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
ज्यांचा जन्म 1,10, 19, 28 तारखेचा असतो, त्यांचा मूलांक 1 असतो. आज तुम्हाला घरी आराम करण्याची संधी मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवनात आनंदी राहील, परंतु प्रेम जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. प्रेमाच्या बाबतीत मन चंचल राहणार आहे, त्यामुळे सावधगिरीने संबंध निर्माण करा.
शुभ अंक-15
शुभ रंग- पांढरा
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2,11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वात आश्चर्यकारक आकर्षण दिसेल. तरुणांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नवीन आणि जुन्या मित्रांसोबत आज तुम्ही खूप मजा कराल. आज तुमच्या प्रियकरावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारच्या गैरसमजामुळे त्याला सोडू नका.
शुभ अंक-35
शुभ रंग-गडद लाल
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. आजचा दिवस तुमची परीक्षा घेऊ शकतो, त्यासाठी तयार राहा. कुणासोबत अनावश्यक संबंध ठेवू नका, त्याचबरोबर खर्चावरही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. उच्च शिक्षणासाठी अनुकूल काळ लवकरच येत आहे. आज तुम्हाला व्यवसायात फायदा होईल.
शुभ अंक-31
शुभ रंग-जांभळा
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. तुमच्या लव्ह लाईफमध्ये तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. आज तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या बॉसचं मन जिंकाल. आज तुमचा तुमच्या मैत्रिणीसोबत चांगला वेळ जाईल. पैशाच्या व्यवहारासाठी आजचा दिवस योग्य आहे. अतिआत्मविश्वासामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
शुभ अंक-26
शुभ रंग-पिवळा
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. आज तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. काही समस्या असू शकतात. आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका, कारण आज तुम्ही तणावात राहणार आहात. तुमच्या निवासस्थानात किंवा नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाकडेही लक्ष द्यावे. गॅस किंवा त्वचेची समस्या असू शकते.
शुभ अंक-15
शुभ रंग-ऑरेंज
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. प्रवासाचे चांगले परिणाम होतील. पदोन्नती मिळू शकते. काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीत समस्या येऊ शकतात. आज तुम्हाला कुठेतरी खरेदी करावीशी वाटेल, परंतु तुमचं तुमच्या खर्चावर नियंत्रण असणं आवश्यक आहे.
शुभ अंक-17
शुभ रंग-पिवळा
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. तुम्हाला आनंदी राहण्याच्या संधी मिळतील. तुमचा प्रिय जोडीदार तुमचे विचार समजून घेईल. वैवाहिक जीवनातही शांतता राहील. तुमच्या जोडीदाराला किंवा प्रिय व्यक्तीला त्रास होईल असे काहीही बोलणार नाही याची काळजी घ्या.
शुभ अंक-10
शुभ रंग-गुलाबी
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. तुम्हाला काही चांगली बातमी ऐकू येईल. जोडीदाराशी संबंध सुधारतील. नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात. विवाहाची शक्यता दिसत आहे. प्रभावशाली लोकांशी संबंध निर्माण होतील. ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांच्यासाठी ही योग्य वेळ आहे.
शुभ अंक-1
शुभ रंग-निळा
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. कुटुंबात काही प्रकारचा त्रास होऊ शकतो. उत्तेजित होऊ नका. आज एखाद्या खास व्यक्तीशी वैचारिक मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांततेने काम करा. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. आज अचानक काही घटना घडू शकतात.
शुभ अंक-6
शुभ रंग-लाल
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















