एक्स्प्लोर

Numerology: अगदी 'स्वर्गात बनलेली जोडी'? 'या' जन्मतारखा म्हणजे 'मेड इन हेवन' जणू, राहू-केतूचं वर्चस्व अन् अनोखं नातं, अंकशास्त्र सांगते...

Numerology: अंकशास्त्रानुसार, काही जन्मतारखा अशा आहेत, ज्यांना स्वर्गात बनलेली' जोडी का मानले जाते? राहू- केतू यांच्यातील या अनोख्या नात्याबद्दल जाणून घ्या.

Numerology: कधी कधी आपण अशा जोडप्यांना पाहतो, ज्यांना पाहताच क्षणी जणू असे वाटते की, या दोघांची जोडी जणू स्वर्गातच बांधली असावी. आजकाल जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत असताना काही जोड्या मात्र एकमेकांसोबत सुखाने नांदतात. अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर आज आपण अशा काही जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांना 'स्वर्गात बनलेली' जोडी मानले जाते, यांच्या वर राहू-केतूचा भरभरून आशीर्वाद असतो, अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया...

'या' जन्मतारखांना 'स्वर्गात बनलेली' जोडी का मानले जाते? अंकशास्त्र सांगते...(Numerology)

अंकशास्त्रानुसार, ज्यांची जन्मतारीख 4, 13, 23, 31 आहे, त्यांचा मूलांक 4 असतो, तर ज्यांची जन्मतारीख 7, 16, 25 आहे, त्यांचा मूलांक 7 असतो, हे लोक एकमेकांशी खूप चांगले जुळवून घेतात. खरं तर, अंकशास्त्रानुसार, या अंकांच्या जोडीला 'स्वर्गात बनलेली' मानले जाते. अंकशास्त्रानुसार, याचे कारण जाणून घेऊया.

राहू - केतूचं अनोखं नातं...

अंकशास्त्रानुसार, राहू हा अंक 4 चा स्वामी आहे, तर अंक 7 केतूशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार, राहू आणि केतू हे वेगळे घटक नसून, ते स्वर्भानू नावाच्या एकाच राक्षसाचे दोन अर्धे भाग आहेत. यामुळेच, जेव्हा अंक 4 आणि 7 मूलांकाचे लोक लोक भेटतात, तेव्हा त्यांच्यात एक विशेष नाते निर्माण होते. हे लोक केवळ चांगले मित्रच बनत नाहीत, तर अत्यंत यशस्वी जोडीदारसुद्धा ठरतात. या अंकांच्या जोड्यांची अनेक उदाहरणे आहेत. 

व्यावहारिक मन, भावनिकतेचा समतोल

अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 चे लोक अत्यंत व्यावहारिक, तार्किक आणि जमिनीवर पाय ठेवणारे असतात, तर ज्यांचा अंक 7 असतो ते भावनिक, संवेदनशील आणि आध्यात्मिक असतात. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात, तेव्हा एक सुंदर नाते निर्माण होते, ज्यात आर्थिक सुरक्षिततेपासून ते आदर आणि प्रेमापर्यंत सर्व काही सामावलेले असते. अंक 4 आर्थिक सुरक्षा प्रदान करतो, तर अंक 7 प्रेम, सखोलता आणि समाधान प्रदान करतो.

न बोलता समजून घेणं.. एकमेकांना आधार देणं..

अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 चे लोक कधीकधी जास्त विचार केल्यामुळे गोंधळून जातात आणि रागावतात, तर अंक 7 असलेले लोक त्यांच्या शांत स्वभावाने आणि सखोल समजुतीने त्यांना हाताळतात. याउलट, जेव्हा अंक 7 असलेले लोक कधीकधी नैराश्याने ग्रस्त होतात, तेव्हा अंक 4 चा व्यावहारिक स्वभाव त्यांच्यात नवीन ऊर्जा भरतो. अंकशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, अंक 4 आणि 7 असलेल्या लोकांचे नाते खूप घट्ट असते, ज्यात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. ते न बोलताही एकमेकांच्या भावना त्वरित समजून घेतात.

हेही वाचा :

Shravan 2026: श्रावण महिना..अध्यात्म - निसर्गाचा सुंदर संगम! कधीपासून सुरू होतोय? यंदा श्रावणी सोमवार किती? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026 : आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget