Shravan 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, अवघ्या दोन दिवसांत श्रावणाला (Shravan) सुरुवात होणार आहे. श्रावणात भगवान शंकर तसेच, देवी पार्वतीची पूजा केली जाते. शिवलिंगावर जल चढवतात. पण, श्रावणात गर्भवती महिलांनी शिवलिंगाची पूजा करावी की करु नये? असा प्रश्न नक्की पडतो. याच संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.

जर एखादी महिना गर्भवती असेल तर तिने देवाची पूजाअर्चा करावी. मंत्र जप करावा. कारण यामुळे बाळाला आणि आईला दोघांनाही फायदा होतो. देवाच्या आशीर्वादाने आई आणि बाळावर कोणत्याच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहत नाही. 

स्कंद पुराणानुसार, भगवान शंकराची आराधना, पूजा, शिवलिंगाची पूजा विशेषत: संतान सुख आणि गर्भावस्थेत होणाऱ्या कष्टांपासून मुक्तीसाठी करु शकता. बाळ आणि आईसाठी या गोष्टी फार लाभदायी आहेत. 

मंत्राचा जप करा

गर्भवती महिलांनी ऊं नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने महिलांचं आरोग्य आणि मन दोन्ही ठीक राहते. 

तणावातून मुक्ती 

गर्भधारणेच्या वेळी गर्भवती महिलांच्या शरीराबरोबरच मानसिक विचारातही अनेक बदल झालेले दिसतात. तसेच, या काळात महिलांचे अनेक मूड स्विंग्सही पाहायला मिळतात. अशातच शिवलिंगाची पूजा केल्याने महिलांना मानसिक शांती मिळते. तसेच, सर्व चिंताही दूर होतात. 

नकारात्मक ऊर्जा 

गर्भधारणेच्या वेळी शिवलिंगाची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव बाळावर राहात नाही. तसेच, ग्रह दोषांपासून देखील मुक्ती मिळते. यामुळे बाळ आणि आईचं शारीरिक तसेच मानसिक आरोग्यही एकदम चांगलं राहतं. 

पूजा करण्याचे नियम 

गर्भधारणेच्या वेळी शिवलिंगाची पूजा करताना दिर्घकाळ उभं राहण्यापेक्षा आरामात बसून पूजा करावी. यामुळे तुमच्या पायांना देखील त्रास होणार नाही. 

हे ही वाचा :                                                                                                                         

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shravan 2025 : श्रावणी शिवरात्रीला जुळून येतायत तब्बल 3 शुभ राजयोग; 'या' राशींवर असणार भगवान शंकराचा आशीर्वाद, मिळणार बंपर लाभ