Navpancham Rajyog 2025: गाडी... बंगला... स्वत:चा व्यवसाय किंवा चांगल्या पगाराची नोकरी, जोडीदार... आयुष्यात माणसाला काय हवं असतं. मात्र हे सर्व एकत्रच मिळेल असं क्वचितच शक्य होतं. कारण हे सर्व सहज मिळत नाही, तर त्याला कष्ट, मेहनत आणि नशीबाची जोड हवी असते. अनेक लोक मेहनत करूनही त्यांना सुख, यश मिळत नाही, तर ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर 12 राशींपैकी 3 राशी अशा आहेत. ज्यांच्यावर लवकरच कृपा बरसणार आहे. कारण 13 सप्टेंबर 2025 पासून मंगळ-गुरूने नवपंचम राजयोग निर्माण केला आहे, आजपासून 45 दिवस 3 राशींच्या लोकांना श्रीमंत होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. जाणून घ्या त्या भाग्यशाली राशींबद्दल...
आजपासून 45 दिवस 'या' 3 राशींची चांदीच चांदी!
ग्रहांचा अधिपती मंगळाने, तूळ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तूळ राशीत बसलेल्या मंगळाने आता गुरूसोबत शुभ नवपंचम योग निर्माण करत आहे, जो 3 राशीच्या लोकांचे भाग्य उघडेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा धैर्य, शौर्य, जमीन निर्मिती, विवाह यांचा कारक आहे. मंगळ सुमारे 45 दिवसांत संक्रमण करतो. 13 सप्टेंबर रोजी मंगळाने तूळ राशीत प्रवेश केला आणि 27 ऑक्टोबरपर्यंत या राशीत राहील. त्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
नवपंचम राजयोग कधीपर्यंत प्रभावी असेल?
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाच्या संक्रमणामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे, जो 27 ऑक्टोबरपर्यंत प्रभावी राहील. गुरू सध्या मिथुन राशीत आहे.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग वृषभ राशीच्या लोकांना दीर्घकालीन समस्यांपासून मुक्ती देईल. जुने आजार बरे होतील. जर काही वादग्रस्त प्रकरण असेल तर आता तुम्हाला त्यातूनही आराम मिळेल. बऱ्याच काळानंतर तुम्हाला मानसिक शांती मिळेल. संपत्ती वाढेल. अविवाहित लोक लग्न करू शकतात.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी या राजयोगामुळे उत्पन्न वाढेल. तुम्ही आर्थिक बळाने आनंदी व्हाल. जीवनात स्थिरता येईल. तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल. बुद्धिमत्तेची तीक्ष्णता तुम्हाला नवीन काम सुरू करण्याचे धाडस देईल. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी वेळ चांगला आहे.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी या राजयोगामुळे अनेक बाबतीत फायदा होईल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. विशेषतः उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना यश मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
हेही वाचा :
Gajkesari Rajyog 2025: आजचा 14 सप्टेंबरचा दिवस अद्भूत! जबरदस्त गजकेसरी राजयोग 'या' 3 राशींच्या नशीबी श्रीमंती आणतोय, पैसा हातात खेळेल, सरप्राईझ मिळेल
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)