Mumbai Rains News मुंबई: मुंबईसह मुंबई उपनगरात पुन्हा एकदा पावसाने (Mumbai Rain) दमदार हजेरी लावली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केल्याने मुंबईकरांची एकाच तारांबळ उडाली आहे. तर पुढील 3 तासांत 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ येण्याची (Weather Update) शक्यता आहे. परिणामी नागरिकांनी सतर्क राहावे. अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहे. त्यामुळे घरा बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन घरा बाहेर पडावं, असा सल्लाही देण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या मुंबई, ठाणे, मुंबई उपनगरसह लगतच्या परिसरात काळ्या ढगांनी एकच गर्दी केली आहे. तर अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत (Maharashtra Weather Update) असून उकड्यापासून हैराण मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तिकडे बेलापूर रस्त्यावर रबाळे पोलीस स्टेशनजवळ पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर अंधेरी ते डोंबिवली दरम्यान जोरदार पाऊस सुरू आहे. सोबतच ठाणे आणि नवी मुंबई परिसरात देखील मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे.
सोलापुरात दिवसभर मुसळधार पाऊस, रात्री अफवांचा पूर, मगर दिसल्याच्या चर्चेने खळबळ
सोलापुरात दिवसभर मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. मात्र मुसळधार पावसामुळे सोलापुरात अफवांचा पूर पाहायला मिळाला. सोलापुरातील अंत्रोळीकर भागात मगर आढळून आल्याचा एक फोटो वायरल झाला. पाण्याच्या वेगाप्रमाणेच हा मेसेज वायरल झाल्याने शहरातील चर्चेला पेव फुटलं. यंत्रणा कामाला लागली, वनविभाग, लोकप्रतिनिधी, पत्रकार सारेच घटनास्थळी पोहोचले. मात्र प्रत्यक्षात असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं समोर आलं. तर AI चा वापर करून कोणीतरी खोडसाळपणा केल्याचं या फोटोवरून दिसतय. या भागात राहणाऱ्या लोकांनी भीती बाळगू नये तसेच जो कोणी वन्यजीव प्राण्यांचे खोटे फोटो वायरल करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आलीय.
मुंबई प्रदेशात मुसळधार पावसामुळे अपेक्षित परिणाम आणि कृती
- स्थानिक रस्ते पूर येणे, सखल भागात पाणी साचणे आणि भुयारी मार्ग बंद होणे.
-मुसळधार पावसामुळे दृश्यमानतेत अधूनमधून घट.
-रस्त्यांवर पाणी साचल्याने काही भागात वाहतूक विस्कळीत होणे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो.
-मुसळधार पावसामुळे आणि पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि निसरडे रस्ते.
-नियमित बाह्य व्यवसाय/क्रियाकलाप प्रभावित होण्याची शक्यता आहे.
-वृक्षारोपण, बागायती आणि उभ्या पिकांचे नुकसान.
-असुरक्षित संरचनांना अंशतः नुकसान.
- कच्च्या घरांना/भिंतींना आणि झोपड्यांना किरकोळ नुकसान.
सुचविलेली कृती:
-वाहतूक सूचनांचे पालन करा.
- घरातच रहा, खिडक्या आणि दरवाजे बंद करा आणि शक्य असल्यास प्रवास टाळा.
-सुरक्षित आश्रय घ्या; झाडे आणि असुरक्षित संरचनांखाली आश्रय घेऊ नका.
- उघड्या विजेच्या तारांना स्पर्श करू नका आणि विजेच्या खांबाजवळ उभे राहण्याचे टाळा.
- ताबडतोब पाण्याच्या स्रोतांमधून बाहेर पडा.
- वीज वाहक असलेल्या सर्व वस्तूंपासून दूर रहा.