Horoscope Today 14 September 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 14 सप्टेंबरचा 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे. आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

कलाकारांच्या जीवनात स्फूर्तीदायक घटना घडतील गुणशास्त्र मंत्रशास्त्र विषयांचा अभ्यास करणाऱ्यांना पोषक ग्रहमान लाभेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आज दिवस कष्टात जाईल तुमच्या पुढे लोक आवाज उठवू शकणार नाहीत.  

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

लेखकांना परखड लेखन करण्यासाठी काळ चांगला आहे. प्रसिद्धीचे योग आहेत.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

घरामध्ये हलके  फुलके आणि प्रेमळ वातावरण राहील. घरात पाहुण्यांची ये जा राहील.

सिंह रास (Leo Horoscope Today)

दोन पिढ्यांमधील अंतर तुम्हाला जाणवेल स्थावर इस्टेटसंबंधी प्रश्न रखडतील.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

महिला कुटुंबातील व्यक्तींसाठी कष्ट करण्यात धन्यता  मानतील. बरोबरीच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

कामाच्या वेळी फक्त काम करणारे तुम्ही लोक नोकरी धंद्याच्या ठिकाणी तुम्हाला हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे कामाचा उत्साह वाढेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

एखादा लाख पत्रात पडण्यासाठी झगडावे लागणार आहे दुसऱ्या मधील अवघड शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये असलेल्या गुणांचा विकास करण्यावर भर द्या.   

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

उठ सूट दुसऱ्यावर टीका करताना दुसऱ्याच्या मनाचा विचार करावा लागेल तुमच्या हट्टी स्वभावामुळे तोटा होण्याचा संभव आहे.     

मकर रास (Capricorn Horoscope Today)

महिलांना कोणाचाही विरोध सहन होणार नाही कोणत्याही अप्रिय गोष्टीचा उमदेपणाने स्वीकार कराल.        

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आहे त्या परिस्थितीत बदल करण्याचा मार्ग पत्कराल व्यवसायात सतत काहीतरी उलाढाल कराल.      

मीन रास (Pisces Horoscope Today)

जोपर्यंत तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही.

हेही वाचा :                 

Lucky Zodiac Signs : 14 सप्टेंबरचा दिवस ठरणार गेमचेंजर! घडणार एकामागोमाग आश्चर्यकारक घटना; संपत्तीत होईल भरभराट?