Nag Panchami 2024 : नागपंचमीच्या शुभ मुहूर्ताने 'या' 3 राशींचं नशीब पालटणार; शनीसह 'या' ग्रहांच्या हालचालींमुळे होणार धनलाभ
Nag Panchami 2024 : आज शुक्र- बुध आणि मंगळ-गुरु ग्रहाची युती जुळून आली आहे. यामुळे सूर्य कर्क राशीत आणि शनी कुंभ राशीत विराजमान होणार आहे. यामुळे शश राजयोग तयार होणार आहे.

Nag Panchami 2024 : श्रावण (Shravan) महिन्यातील आज पंचमी तिथी असून आज सर्वत्र नागपंचमीचा (Nag Panchami) सण साजरा केला जातोय. श्रावणात येणाऱ्या नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नागदेवतेला दुधाचा अभिषेक करुन नागदेवतेला प्रसन्न केलं जातं. तसेच, भगवान शंकराची पूजा केली जाते. या दिवशी अनेक शुभ योग जुळून आले आहेत. असं म्हणतात की, नागपंचमी अनेक शुभ फळ घेऊन येते. यासाठीच आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत.
आज शुक्र- बुध आणि मंगळ-गुरु ग्रहाची युती जुळून आली आहे. यामुळे सूर्य कर्क राशीत आणि शनी कुंभ राशीत विराजमान होणार आहे. यामुळे शश राजयोग तयार होणार आहे. या व्यतिरिक्त राहु मीन राशीत आणि केतु कन्या राशीत विराजमान होणार आहे. तसेच, आजच्या दिवशी सिद्ध योग, रवि योग आणि साध्य योगासह अनेक शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे तीन राशीच्या लोकांवर शनी प्रसन्न असणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नागपंचमीचा दिवस फार शुभ असणार आहे. कारण शुक्र, बुध, गुरु, मंगळ, सूर्य आणि शनीच्या चालीने सिंह राशीच्या लोकांना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात येणारी संकटं हळूहळू दूर होतील. तसेच, तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या काळात तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे.
वृषभ रास (Scorpio Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज शनी, शुक्र, गुरु, मंगळ, बुध आणि सूर्य ग्रह शुभ योगाची निर्मिती करणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचा चांगला सपोर्ट मिळेल. व्यापाराच्या दृष्टीने अनेक नवीन स्त्रोत तुमच्यासाठी खुले होतील. घरात सुख-शांती टिकून राहील. तसेच, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार चांगला आहे. आज सूर्य, बुध, शुक्र, गुरु, मंगळ आणि शनीची चाल मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक नवीन मार्ग खुले होतील. तसचे, जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या लव्ह लाईफमध्ये रोमान्स वाढलेला दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 09 August 2024 : आज नागपंचमीच्या दिवशी 'या' राशींवर नागदेवता होणार प्रसन्न; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
