May Born People Nature : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्याला एक विशेष महत्त्व असते. त्यानुसार, प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या बाळांचा स्वभाव, त्यांची आवड निवड, त्यांचं भविष्य ठरवलं जातं. एप्रिल (April) महिना संपून मे (May) महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मे महिन्यात सूर्य मेष आणि वृषभ राशीत प्रवेश करतो. यामुळे या महिन्यात जन्मलेल्या लोकांवर या दोन ग्रहांचा विशेष प्रभाव दिसून येतो. मे महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्येही सूर्याचे अनेक गुण पाहायला मिळतात. चला तर जाणून घेऊयात मे महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये असे कोणते गुण असतात जे त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतात.


मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?


मे महिन्यात जन्मलेले लोक इतरांसमोर त्यांचे शब्द काळजीपूर्वक वापरतात. कोणत्याही समस्येला तोंड कसं द्यायचं हे त्यांना चांगलंच ठाऊक असतं. त्यांना नवीन माहिती संपादन करायला, नवीन गोष्टी शिकायला आवडतात. या महिन्यात जन्मलेले लोक हुशारही असतात. या लोकांना इतरांची मनं देखील चांगलीच ओळखता येतात. 


मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे शिक्षण आणि करिअर 


मे महिन्यात जन्मलेल्या लोकांना नवीन गोष्टी जाणून घ्यायला, शिकायला आणि शिकवायला आवडतं. या लोकांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घ्यायला आवडतं. आपल्या रोजच्या जीवनात देखील हे लोक तंत्रज्ञानाचा वापर करतात. मे महिन्यात जन्मलेल्या लोकांना चित्रकला, छायाचित्रण, सर्जनशील अॅक्टिव्हिटी आणि वाचन, लेखन करायला आवडते. त्यांनाही या क्षेत्रात करिअर करायला आवडते.


मे महिन्यात जन्मलेल्या लोकांची 'अशी' असते समज


मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव हा मुळातच मनमिळाऊ असल्यामुळे त्यांना सर्वांबरोबर एकत्र राहायला आवडते. त्यांच्यात सहानुभूतीची भावना आहे. यामुळेच त्यांचे कोणाशीही नाते दीर्घकाळ टिकते. हे लोक आपल्याबरोबर इतरांच्याही चांगल्याचा विचार करतात. बिझनेसच्या बाबतीत यांची व्यवसायावर पकड चांगली असते. 


मे महिन्यात जन्मलेल्या लोकांना काय आवडतं?


मे महिन्यात जन्मलेले लोक कोणतेही काम अगदी मनापासून करतात. यामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी अपार मेहनत करण्याची यांच्यात क्षमता असते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Chanakya Niti : आयुष्यात कधीच पडणार नाही मागे; उंच भरारी घेण्यासाठी पक्ष्यांकडून शिका 'या' 4 गोष्टी, चाणक्य सांगतात...