Chanakya Niti : जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मंत्र आचार्य चाणक्यांनी (Chanakya) त्यांचा ग्रंथ चाणक्य नीतीत (Chanakya Niti) सांगितले आहेत. चाणक्य म्हणतात, तुम्हाला कुठूनही आणि कोणाकडूनही जर काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळत असतील, तर तुम्ही त्या आत्मसात केल्या पाहिजे, मग ते प्राण्यांकडूनही का असेना.


चाणक्य म्हणतात, या दुनियेत देवाने प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गुणासोबत पाठवलं आहे. जगातील प्रत्येक जीव हा अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. पृथ्वीवरील अगदी छोट्यातल्या छोट्या जीवाकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं. आचार्य चाणक्यांच्या मते, काही पक्ष्यांकडून (Birds) देखील आपल्याला अनेक धडे मिळतात, ज्याचा वापर करुन आपण जीवनात यश मिळवू शकतो. चाणक्य नीती सांगते, पक्ष्यांमधील खालील 4 गुणांचा अवलंब करून तुम्ही जीवनात यश मिळवू शकता आणि तुमचं ध्येय साध्य करू शकता.


पक्ष्यांकडून शिका या 4 गोष्टी 


बगळ्याकडून शिका संयम


आचार्य चाणक्य म्हणतात, आपण बगळ्याकडून संयमी वृत्ती शिकून घेतली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून आपल्या क्षमतेप्रमाणे नीट काम केलं पाहिजे. संयम आणि धीराने घेतलेल्या गोष्टी या नेहमीच शुभ फल देतात.


कोकिळेकडून शिका गोड बोलणं


कोणतंही काम आपण आपल्या जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून केलं पाहिजे, अशी म्हण आहे. आता यातलाच गोड बोलण्याचा गुण आपण कोकिळेकडून शिकला पाहिजे. कोकिळेला आपण काळ्या रंगावरुन हिणवत असलो तरी तिच्या मधुर आवाजाने ती सर्वांचं मन मोहून टाकते, त्याचप्रमाणे स्वभावातील नम्रतेने लोकांना जिंकते. जर तुम्ही खूप सुंदर दिसत असाल, पण तुमच्या बोलण्यात कठोरता असेल तर कोणीही तुमच्याकडे आकर्षित होणार नाही. त्यामुळे दुसऱ्याशी बोलताना नेहमी कोकिळेसारखी गोड वाणी ठेवावी.


कावळ्याकडून घ्या हा गुण


कावळ्याकडून शिकण्यासारखा पहिला गुण म्हणजे, कधीच कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. व्यक्तीने नेहमी कावळ्यासारखे सावध राहावे. चाणक्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने पैशांची बचत करावी, ज्याप्रमाणे कावळा प्रत्येक गोष्ट सांभाळून वापरतो.


कोंबड्याकडून शिका हे गुण


आचार्य चाणक्य म्हणतात, कोंबडा नेहमी ब्रम्ह मुहूर्तावर उठतो. तुम्हालाही जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही रोज ब्रम्ह मुहूर्तावर उठलं पाहिजे. कोंबड्याची दुसरी सवय म्हणजे नेहमी प्रत्येक स्पर्धेत पुढे राहणं. कोंबड्याची तिसरी सवय म्हणजे आपल्या भावांना समान वाटा देणं आणि गोळीमिळीने सर्वांसोबत अन्नग्रहण करणं. कोंबड्याचे हे गुण तुम्ही आत्मसात केले तर तुम्हाला पदोपदी यश मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Chanakya Niti: सिंह म्हणून जन्माला आलात सिंहासारख जगायला शिका..! चाणक्य म्हणतात,जंगलाच्या राजाकडून शिका 'या'चार गोष्टी, मिळेल घवघवीत यश