Mauni Amavasya 2025 : सर्व अमावस्यांमध्ये हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. हिंदू पंचांगानुसार, या वर्षी मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 रोजी आहे. या दिवशी गंगा स्नान, दान, पितरांना नैवेद्य दाखवणं आणि इतर पूजाविधी केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-शांती येते आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो, असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या शुभ मुहूर्तावर राशीनुसार काही विशेष उपाय (Mauni Amavasya Upay) केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. हे उपाय नेमके कोणते? जाणून घेऊया.


मेष


ज्योतिष शास्त्रानुसार, मौनी अमावस्येच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी गरिबांना कपडे आणि आवश्यक वस्तू दान कराव्यात. असं केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल आणि तुमची अभूतपूर्व प्रगती होऊ शकते.


वृषभ


मौनी अमावस्येच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी लक्ष्मीची पूजा करावी, असं केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.


मिथुन


मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी गाईला हिरवा चारा खायला द्यावा, असं केल्याने तुमच्या घरात सुख-शांती नांदेल.


कर्क


कर्क राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण करावं, असं केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुमचं आरोग्यही सुधारेल.


सिंह


सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी लाल रंगाचे कपडे दान करावे, यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येईल.


कन्या


कन्या राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी कोणत्याही शनि मंदिरात जाऊन अख्खे उडीद अर्पण करावे, असं केल्याने शनिशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.


तूळ


तूळ राशीच्या लोकांनी या दिवशी तांदूळ आणि दूध दान करावं, असं केल्याने तुमच्या कुटुंबात समृद्धी येईल.


वृश्चिक


वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी हनुमानाला गूळ अर्पण करावा, यामुळे तुमचं प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतं.


धनु


धनु राशीच्या लोकांनी या दिवशी भगवान शंकराला मध अर्पण करावं, असं केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.


मकर


मकर राशीच्या लोकांनी या दिवशी मोहरीच्या तेलात काळे तीळ टाकून दिवा लावावा, यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते.


कुंभ


कुंभ राशीच्या लोकांनी काळे उडीद दान करावे, यामुळे पैशाची कमतरता दूर होईल आणि जीवनात सुख-समृद्धी नांदेल.


मीन


मीन राशीच्या लोकांनी विष्णू देवाला पंचामृत आणि पंजिरी अर्पण करावी, असं केल्याने तुम्हाला आर्थिक फायदा होईल आणि जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Mauni Amavasya : यंदाची पौष अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 28 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले