Margashirsha Amavasya 2024 : मार्गशीर्ष अमावस्येला सूर्य आणि पितरांच्या उपासनेचे खूप महत्त्व आहे. अशात या दिवशी सूर्य आणि शनीचे परिवर्तन काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. सूर्य आणि शनि हे ज्योतिषशास्त्रातील सर्वात महत्त्वाचे ग्रह मानले जातात. जेव्हा ते संक्रमण करतात तेव्हा त्यांचा राशींवर खोल प्रभाव पडतो. मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी सूर्य उत्तराषाद नक्षत्रात प्रवेश करेल आणि शनि शतभिषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात संक्रमण करणार आहे. अशा स्थितीत सूर्य आणि शनि सर्व राशींवर परिणाम करणार आहेत. मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींवर सूर्य आणि शनीचा चांगला तसेच वाईट परिणाम होणार आहे. जाणून घेऊया सूर्य आणि शनीचा कोणत्या राशीवर काय परिणाम होईल? जाणून घ्या..


 


मार्गशीर्ष अमावस्येला कधी आहे?


मार्गशीर्ष अमावस्या 11 जानेवारी 2024 रोजी आहे. या वेळी मार्गशीर्ष अमावस्या, सूर्य आणि शनीचा नक्षत्र बदल विशेष मानला जातो. या दिवशी सूर्य 08.24 मिनिटांनी उत्तराषाद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनीच्या शतभिषा नक्षत्राचा दुसरा चरण सुरू होईल. अशात मार्गशीर्ष अमावस्या काही राशींसाठी खास असणार आहे. जाणून घेऊया सूर्य आणि शनीच्या परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.


मार्गशीर्ष अमावस्या 2024 या राशींना लाभदायक ठरेल


वृषभ


पौष अमावस्येला सूर्य आणि शनीचे परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबासोबतच समाजातील सदस्यांशीही नाते घट्ट होऊ शकते. जोडीदारासोबत आयुष्य आनंददायी जाईल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल. योजना व्यवसाय विस्तारासाठी आर्थिक लाभ देईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी सुसंवाद निर्माण करा, यामुळे तुमचे नशीब उजळेल.


कर्क


सूर्य आणि शनीच्या राशीतील बदलामुळे कर्क राशीच्या लोकांना धन, शिक्षण, संतती आणि प्रेम जीवनात आनंद मिळेल. तुमचा इच्छित जोडीदार मिळण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते, तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीशी तुमचे नाते सकारात्मक राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेम जीवन उत्तम राहील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल. ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनतीचे फळ मिळेल.


कुंभ


कुंभ राशीच्या लोकांना पौष अमावस्येला त्यांच्या करिअरमध्ये विशेष लाभ मिळेल. नोकरीत चांगल्या संधी मिळतील. नोकरदारांना यशासोबत मान-सन्मान मिळेल, प्रामाणिकपणे काम करत राहा. प्रेमसंबंधात मधुरता वाढेल. कोर्ट केसेसमधून दिलासा मिळेल. या दिवशी शनि आणि सूर्याची उपासना केल्यास जीवनात आनंद मिळेल.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 8 To 14 January 2024 : जानेवारीच्या नव्या आठवड्यात 4 राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असेल! सुख, सौभाग्य वाढेल