Mangal Guru Yuti 2024 : ग्रहांचा सेनापती मंगळ ठराविक कालावधीनंतर राशी बदलतो. यावेळी मंगळ मेष राशीमध्ये स्थित आहे आणि 12 जुलै रोजी सकाळी 6:58 वाजता तो वृषभ राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीत गुरू आधीपासूनच उपस्थित आहे, अशा स्थितीत वृषभ राशीत मंगळ आणि गुरूचा संयोग होत आहे. दोन्ही शक्तिशाली ग्रहांचं एकत्र येणं अनेक राशीच्या लोकांचं जीवन पालटू शकतं, या राशींच्या जीवनात सुखांच्या सरी येतील. या नेमकं कोणत्या राशींचं नशीब 12 जुलैनंतर पालटणार? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


या राशीच्या दुसऱ्या घरात मंगळ आणि गुरूची युती होत आहे. हे घर धन, कुटुंब, बचत आणि वाणीचं कारक आहे. अशा स्थितीत या काळात तुमचं प्रलंबित काम पूर्ण होईल. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल, यामुळे कुटुंबातील दीर्घकाळ चाललेला वाद संपुष्टात येऊ शकतो. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तुमचं उत्पन्न वाढू शकतं. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. मालमत्ता, वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. यासोबतच आरोग्यही चांगलं राहणार आहे.


वृषभ रास (Taurus)


या राशीच्या चढत्या घरात मंगळ आणि गुरूची युती होत आहे, त्यामुळे या काळात वृषभ राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो. गुरु आणि वडिलांकडून काही मोठा लाभ होऊ शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुमचं शिक्षण घेण्याचं किंवा परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. व्यवसायाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.


मीन रास (Pisces)


या राशीच्या तिसऱ्या घरात मंगळ आणि गुरूचा संयोग होत आहे. अशा स्थितीत मीन राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. यासोबतच तुम्ही वाहनं आणि मालमत्ता खरेदी करू शकता. शारीरिक आणि मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. नोकरदार लोकांनाही बरेच फायदे मिळू शकतात. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर हा काळ योग्य आहे, याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. यासोबतच तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani Dev : पावसाळ्यात गरजूंना फक्त 'या' छोट्या गोष्टींचं करा दान; शनी महाराज होतील अतिप्रसन्न, वर्षभर नांदेल सुख-संपत्ती