Shani Dev : पावसाळा (Monsoon 2024) सुरू झाला असून पावसाच्या सरींमुळे सगळीकडे हिरवळ पसरली आहे. हिंदू महिन्याचा पवित्र महिना श्रावण (Shravan 2024) देखील पावसाळ्यात येतो, जो 22 जुलै 2024 पासून सुरू होत आहे.
तसं पाहिलं तर, श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. पण यावेळी शनि महाराजांच्या (Shani Dev) पूजेचंही महत्त्व आहे. पावसाळ्यात लहान-लहान उपाय करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता. या उपायांनी शनि साडेसाती आणि धैय्येचा प्रभावही कमी होतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी पावसाळ्यात या गोष्टींचं दान तुम्ही करू शकता.
पावसाळ्यात कोणत्या वस्तूंचं दान करावं?
काळ्या वस्तूंचे दान : काळा रंग शनिदेवाशी संबंधित आहेत. त्याला हा रंग खूप आवडतो, त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळ्या रंगाच्या वस्तू गरीब आणि गरजूंना तुम्ही दान करू शकता.
छत्री दान : पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. विशेषत: मजूर आणि गरीब वर्गातील लोकांना अशा परिस्थितीत घराबाहेर पडणं कठीण जातं, त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही काळ्या रंगाची छत्री दान करू शकता, यामुळे शनि महाराजही प्रसन्न होतील.
चप्पल दान : पावसाळ्यात काळ्या रंगाचे जोडे आणि चप्पल गरिबांना दान केल्याने शनीची विशेष कृपा प्राप्त होते. साडेसातीचा प्रभाव देखील या उपायामुळे कमी होतो.
कुत्र्यांची सेवा करा : पावसाळ्यात कुत्र्यांना खाण्यापिण्यात अडचणी येतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना मदत करून त्यांना खायला द्यावं. काळ्या कुत्र्यांच्या सेवेने शनिदेव खूप प्रसन्न होतात असं मानलं जातं.
पक्ष्यांना खायला द्या : पावसाळी वेळ ही पक्ष्यांनाही त्रासदायक ठरते. अशा वेळी पक्ष्यांना आसरा देऊ शकता, त्यांना खायला देऊ शकता. या उपायामुळे साडेसाती आणि धैय्येचा प्रभाव कमी होतो.
काळ्या उडदाचे दान : शनिवारी काळे उडीद दान करा, यामुळे तुम्हाला शनीच्या महादशेतील त्रास सहन करावा लागणार नाही. तुमचं जीवन समृद्ध होईल आणि कोणतीही समस्या भेडसावणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :